शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

लिंगनूर येथील बिअरबार परमिटरूमला महिलांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST

लिंगनूर येथे १९७२ मध्ये तत्कालीन सरपंच दत्तात्रय मगदूम व स्व. मारूतीराव नलवडे यांनी दारू व बिअरबार परवाना न देण्याचा ...

लिंगनूर येथे १९७२ मध्ये तत्कालीन सरपंच दत्तात्रय मगदूम व स्व. मारूतीराव नलवडे यांनी दारू व बिअरबार परवाना न देण्याचा कायमस्वरूपी ठराव ग्रामसभेत घेतला होता. तेव्हापासून त्याचा अंमल सुरू होता. मात्र, गतवर्षी कोरोना काळात सर्व सदस्य व सरपंच यांचा कार्यकाल संपल्यानंतर ग्रामपंचायातीमध्ये प्रशासक नेमणूक झाली. याचा फायदा घेत गावातील नागरिकांना अंधारात ठेवत कोणालाही कल्पना न देता ग्रामसेवक आणि प्रशासक यांनी परस्पर बिअरबार परवानगीसाठी ग्रामपंचायतीकडून ना हरकत परवानगी दिली. आता नवीन ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक बैठकीत अवैध बिअरबार आणि परमिट रूमला परवाना रद्द करण्याचे ठराव घेऊन मिरज ग्रामीण पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क विभागास निवेदन दिले आहे. तसेच लिंगनूर येथील महिला व नागरिकांनी बिअरबार परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. नूतन महिला ग्रामपंचायत सदस्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कोट

गावातील कोणत्याही व्यक्तीला कल्पना न देता प्रशासकाने बिअरबार परवान्यासाठी ना हरकत पत्र दिले आहे. यामुळे गावातील अनेक लोक व्यसनाधीन होतील. ग्रामपंचायतीकडून परवाना रद्द करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागास ठराव दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत परवाना रद्द करण्यात येईल.

- मारुती पाटील, सरपंच लिंगनूर