शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातून महिला आरोपीचे पलायन

By admin | Updated: June 12, 2016 01:23 IST

मासिक धर्माचा बहाणा : पोलिस ठाण्यातील घटना; महिला कोल्हापूरची

इस्लामपूर : सोन्याचे दागिने लुबाडण्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या कोल्हापूरच्या संशयित महिलेने मासिक पाळी आल्याचा बहाणा करीत थेट पोलिस ठाण्यातून धूम ठोकली. या घटनेनंतर कामगिरीवरील महिला पोलिसांनी आरडाओरडा करेपर्र्यंत ही महिला पसार झाली होती. शनिवारी पहाटे पावणेतीन वाजता ही घटना घडली. घटनेनंतर हादरलेल्या पोलिसांनी तिन्ही जिल्ह्यांची नाकाबंदी करीत तातडीने शोधमोहीम राबविली. मात्र, ही संशयित महिला हाती लागली नाही. पूनम संतोष माने (वय २०, रा. रेल्वे स्टेशनजवळ, कोल्हापूर) असे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. ६ जून रोजी ही महिला इस्लामपूर बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन कामेरी येथील एका वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ चोरत असताना, अवधूत हंगवाळे, सचिन कनप या पोलिस कर्मचाऱ्यांनी तिला रंगेहात पकडले होते. त्यानंतर येथील न्यायालयाने तिला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. कोठडीची ही मुदत संपल्यानंतर पोलिसांनी तिची सांगलीच्या जिल्हा कारागृहात रवानगी केली होती. पूनम माने रेकॉर्डवरील संशयित महिला असल्याने तिला पुन्हा दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यात कारागृहातून पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले, त्यावेळी तिच्या वकिलांनी आधारकार्ड हजर करीत वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. न्यायालयाने पूनम माने हिच्या वैद्यकीय चाचणीचे आदेश दिले. त्यानुसार दंतवैद्यक वगळता इतर चाचण्या शुक्रवारी करण्यात आल्या. शनिवारी तिची दंतवैद्यक तपासणी करण्यात येणार होती. या दरम्यान पहाटे पावणेतीनच्या सुमारास पूनम माने हिने कामगिरीवरील महिला पोलिसाकडे, आपणास मासिक पाळी सुरू झाल्याचे सांगितले. ही महिला पोलिस तिला घेऊन प्रसाधनगृहाकडे जात असताना, तिने पुन्हा कापडाची मागणी केली. महिला पोलिस कापड शोधण्याच्या कामात व्यस्त असल्याचे पाहून पूनमने पोलिस ठाण्याच्या मागच्या बाजूने धूम ठोकली. हा प्रकार लक्षात येताच महिला पोलिसांनी आरडाओरडा केला. मात्र वीजपुरवठा नसल्याने, अंधाराचा फायदा घेत पूनम पसार झाली. या गंभीर घटनेची रात्रगस्तीवरील पोलिसांसह वरिष्ठांना माहिती देण्यात आली. तातडीने सगळीकडे नाकाबंदी करून शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, ही महिला सापडली नाही. सांगलीहून आलेल्या बिल्लू श्वानाने पोलिस ठाण्याच्या पाठीमागून पोलिस वसाहत, मंत्री कॉलनी, वाकळे वखारमार्गे यल्लम्मा चौक, सावकार कॉलनीतून पेठ-सांगली रस्त्यापर्यंत माग काढला. महिलेच्या शोधासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात तपासपथके रवाना करण्यात आली आहेत. तिच्याविरुद्ध पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पळून जाण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संगीता पाटील अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)