शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

मजरेवाडीचा कारभार सरपंचांविनाच

By admin | Updated: January 21, 2015 23:58 IST

पाच वर्षांपासून अशीच स्थिती : निवडणूक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; मागासवर्गीय समाज पदापासून वंचित

गणपती कोळी - कुरुंदवाड -मजरेवाडी (ता. शिरोळ) गावचा कारभार गेल्या पाच वर्षांपासून सरपंचांविनाच चालू आहे. सरपंचपद मागासवर्गीयांसाठी आरक्षित असताना प्रभागात मागासवर्गीय आरक्षण टाकले गेले नसल्याने या समाजाला आरक्षणाचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे गेली पाच वर्षे गावचा कारभार उपसरपंचांवरच चालू असून, निवडणूक अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे मागासवर्गीय समाजाला सरपंचपदापासून वंचित राहावे लागल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.कुरुंदवाड शहरापासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर कृष्णा नदीकाठी वसलेले अडीच हजार लोकवस्तीचे मजरेवाडी गाव आहे. गावामध्ये जैन समाजाची संख्या अधिक आहे. इतर समाजाची संख्या अत्यल्प आहे. समाजातील उपेक्षित घटकांनाही राजकारणात संधी मिळावी, यासाठी शासनाने मागासवर्गीयांसाठी आरक्षण दिले आहे. त्यानुसार निवडणुकीपूर्वी आरक्षण जाहीर केले जाते.येथील नऊ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत शासनाच्या धोरणानुसार २०११ ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपद मागासवर्गीयांसाठी (बीसी) राखीव करण्यात आले. शंभरापर्यंत मतदार असलेल्या या समाजाला सरपंचपदाची संधी मिळणार असल्याने समाजात आनंद व्यक्त होत होता. या समाजातून उमेदवार मिळविण्यासाठी गटनेत्याचीही उमेदवार चाचपणी झाली. प्रभाग क्रमांक दोनमध्ये हा समाज आहे. मात्र, प्रभागनिहाय आरक्षणात मागासवर्गीय आरक्षण काढण्यात आले नाही. त्यामुळे सरपंचपद मागासवर्गीयांसाठी आरक्षण असूनही प्रभागात आरक्षणच नसल्याने राजकीय गटनेत्यांची गोची झाली.गावामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, कॉँग्रेस, राजेंद्र पाटील-यड्रावकर गट आहेत. गत निवडणुकीत स्वाभिमानी व कॉँग्रेस एकत्र येऊन यड्रावकर गटाविरोधात निवडणूक झाली. या निवडणुकीत यड्रावकर गटनेते लक्ष्मण चौगुले यांनी खुल्या प्रभागातून मागासवर्गीय उमेदवार दिला होता. मात्र, त्या उमेदवाराचा पराभव झाला, तर स्वाभिमानी व कॉँग्रेसला मागासवर्गीय उमेदवारच न मिळाल्याने व सरपंचपद मागासवर्गीयांसाठी राखीव असल्याने गेली पाच वर्षे गावचा कारभार सरपंचांविनाच चालू आहे.या उपेक्षित समाजाला गावचे नेतृत्व करण्यासाठी शासनाने आरक्षण दिले. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रभागनिहाय आरक्षण चुकीच्या निर्णयामुळे या समाजाला आरक्षणाचा लाभ न मिळाल्याने या समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरपंचपद मागासवर्गीयांसाठी असल्याने प्रभागातही आरक्षण टाकणे गरजेचे होते. मात्र, प्रभाग आरक्षणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आरक्षण न टाकल्याने त्याचवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. समाजाच्या लोकसंख्येनुसार आरक्षण टाकण्यात येत असून, यावर कोणताही बदल करता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने आम्हाला काहीही करता आले नाही. या समाजावर मात्र अन्याय झाला आहे.- नंदकिशोर पाटील, गटनेता - स्वाभिमानी शेतकरी संघटना, मजरेवाडी.