शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी भाजपच्या दावणीला बांधण्याचा अधिकार कोणी दिला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:27 IST

बोरगाव : वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष भाजपच्या दावणीला बांधण्याचा अधिकार तालुकाध्यक्ष विजय पाटील यांना कोणी दिला? राष्ट्रवादीची भूमिका ...

बोरगाव : वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष भाजपच्या दावणीला बांधण्याचा अधिकार तालुकाध्यक्ष विजय पाटील यांना कोणी दिला? राष्ट्रवादीची भूमिका जयंत पाटील ठरवतात, पण कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपच्या सुरेश भोसले यांना असल्याचे सांगून पक्ष आणि जयंत पाटील यांना बदनाम करण्याचा उद्योग विजय पाटील करत असल्याचे मत राजारामबापू सूतगिरणीचे संचालक उदयसिंह शिंदे यांनी व्यक्त केले.

बोरगाव येथे कृष्णा कारखान्याच्या सभासद बैठकीत ते बोलत होते.

शिंदे म्हणाले की, अविनाश मोहिते राष्ट्रवादीचे सरचिटणीस आहेत, तर जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. आम्ही पक्षाचे पदाधिकारी कारखान्यातील सत्ताधारी भाजपच्या म्हणजे भोसले गटाच्या विरोधात आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या पश्चात पक्षाची भूमिका परस्पर स्पष्ट करणे बालीशपणाच आहे.

विजय पाटील हे जयंत पाटील यांच्यावर भोसले कुटुंबाने केलेले आघात विसरले असावेत. राजारामबापूंच्या निधनानंतर जयंत पाटील आमदारकीच्या निवडणुकीला उभारणार होते, त्यावेळी जयवंतराव भोसले यांनी त्यांचे वय कमी असल्याबाबत जन्मतारखेचा दाखला देऊन पाच वर्षे राजकीय खच्चीकरण केले. जयंत शुगर कारखाना पेठनाक्यावर उभा करण्याचा घाटही घातला होता. सुरेश भोसले यांनी मुलाला भाजपचा आमदार करण्यासाठी वाळवा तालुक्यातील दोन हजार कामगारांच्या कुटुंबांचे मतदान कराडमध्ये नेण्याचा प्रयत्न केला होता. जयंत पाटील यांची भूमिका विजय पाटील यांनी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टवरून जाहीर करू नये. करायचीच असेल तर स्वत: भोसले पितापुत्रांनी जाहीर करावी.

शिंदे म्हणाले की, आम्ही सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी जयंत पाटील यांना भेटून याबाबत कारवाईची मागणी करणार आहोत.

नेर्लेचे सुभाष पाटील, सुरेश पाटील, शिवराज जाधव, संभाजी दमामे, वसंत पाटील, महेश पवार, केदार शिंदे उपस्थित होते.