शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

मैदान येईल, तेव्हा कुस्तीचे ठरवू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लांब आहेत. जेव्हा मैदान येईल, तेव्हा कसे लढायचे ते ठरवू, अशी प्रतिक्रिया खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठीच आपली तयारी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, मी कोणाच्या वशिल्याने, कोणासाठी लाचारी करून या पदापर्यंत पोहोचलो नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लांब आहेत. जेव्हा मैदान येईल, तेव्हा कसे लढायचे ते ठरवू, अशी प्रतिक्रिया खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठीच आपली तयारी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, मी कोणाच्या वशिल्याने, कोणासाठी लाचारी करून या पदापर्यंत पोहोचलो नाही. स्वाभिमानानेच राजकारण केले आहे. त्यामुळे यापुढेही त्याचपद्धतीने मी राजकारण करणार आहे. पक्षांतर्गत संघर्षाचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. माझे काम मी फक्त करीत आहे. कोणावर विनाकारण टीकाटिपणी करणार नाही. वेळ येते तेव्हा मी समोरूनच वार करतो. लपून वार करण्याचा माझा स्वभाव नाही. विधानसभा किंवा लोकसभा लढविण्याविषयी लोकच चर्चा करीत आहेत.लोकसभेला लोकांनी माझ्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे लोकसभेचीच तयारी मी करेन. तरीही या गोष्टीवर आताच बोलणे बरोबर नाही. कोणत्याही निवडणुकीचा निर्णय पक्षीय पातळीवर घेतला जातो. त्यामुळे पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करीत राहणार आहे.अजितराव घोरपडे यांचे नाव न घेता ते म्हणाले की, काही लोकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न वारंवार करीत आहे. त्याबाबत आशावादी आहे. पक्षीय बैठकांना, कार्यक्रमांना कोण उपस्थित राहत आहे यापेक्षा, त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहे.पतंगरावांची भेट राजकीय नव्हेसंजयकाका पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक भागातील नागरिकांनी मला निवडून दिले आहे. नागठाण्यातूनही मला मोठ्या प्रमाणावर मतदान झाले आहे. त्यामुळे कोणत्याही गावातील नागरिकांनी मला बोलावले, तर तेथे जाणे माझे कर्तव्य आहे. याच कर्तव्यभावनेने नागठाण्यातील बालगंधर्व पुरस्कार प्रदान सोहळ्यास उपस्थित होतो. पतंगराव कदम यांनी माझे व मीही त्यांच्या काही गोष्टींचे कौतुक केले. ज्यावेळी आमच्या दोघांमध्ये संघर्ष झाला, तेव्हा उघडपणे त्यांच्यावर मी आरोपही केले होते. त्यामुळे आमची भेट ही कार्यक्रमातून झालेली औपचारिकता होती. राजकीय भेट म्हणून त्याची चर्चा चुकीची आहे.