शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

वांगीत आठवडी बाजार रस्त्यावर भरल्याने वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे आठवडी बाजार मुख्य पेठ असणाऱ्या रस्त्यावर भरत असल्याने वाहतुकीची मोठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे आठवडी बाजार मुख्य पेठ असणाऱ्या रस्त्यावर भरत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी आहे. ग्रामपंचायत प्रशासन बाजार भरविण्यासाठी पर्याय असताना दुर्लक्ष करीत आहे. ग्रामपंचायतीने लक्ष दिल्यास ग्रामसचिवालय व एसटी बसस्थानक परिसरात मोठी जागा उपलब्ध असल्यामुळे आठवडा बाजार या ठिकाणी सुरू होऊ शकतो. आठवडी बाजार हा गुरुवारी असून, हा बाजार दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असतो. या बाजारामुळे सांगली ते सातारा रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

रस्त्यावर भरविण्यात येणाऱ्या आठवडी बाजारामुळे नागरिकांना व व्यापाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

रात्रीच्या बाजारामुळे बाजारातून विनाकारण फिरणारे युवक, बाजारातून जाणाऱ्या दुचाकी गाड्यांचा मोठा त्रास होतो. याचबरोबर गर्दीचा फायदा घेऊन लोखो रुपयांचे मोबाईल बाजारातून चोरीस गेले आहेत. वांगी हे गाव अनेक लहान खेडयांना जोडले आहे. याचबरोबर परिसरात ऊसतोड करण्यासाठी सोनहिरा, क्रांती, कृष्णा, ग्रीनपावरशुगर, यशवंत- नागेवाडी, तासगाव कारखान्यांकडे येणारे मजूरही आठवडी बाजारास येत आहेत. कर्नाटकातील इतर पंधरा ते वीस कारखान्यांना आलेले ऊसतोड मजूर त्यामुळे दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत बाजारात मोठी गजबज असते. या बाजारात भाजीपाला, कपडे खरेदी व विक्री करण्यासाठी मोठी गर्दी होत असते.

गावातील वाड्या-वस्त्यांवरून व परगावाहून आलेल्या नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था नसल्याने सर्व वाहने रस्त्यावर लावली जातात. त्यामुळे सांगली- सातारा व गावांत जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होते. पलूस, सांगली, कडेपूर, सोनहिरा कारखान्याकडे जाणारी वाहतूक थांबली जाते.

तरी एसटी बसस्थानक परिसर किंवा ग्रामसचिवालय परिसरात मोठया ठिकाणी बाजार भरवल्यास वाहतुकीबरोबर इतर असणाऱ्या समस्या दूर होतील.