शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

मेंढपाळ धनगर समाज बांधवांना तातडीने लस देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : उदरनिर्वाहासाठी राज्यातील मेंढपाळ धनगर समाज भटकंती करीत रानोमाळ फिरत असतो. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मेंढपाळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : उदरनिर्वाहासाठी राज्यातील मेंढपाळ धनगर समाज भटकंती करीत रानोमाळ फिरत असतो. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मेंढपाळ धनगर समाज बांधवांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राज्य शासन पुढाकार घेऊन मेंढपाळ धनगर समाज बांधवांना तातडीने कोविड लस दिली जाईल, अशी ग्वाही जलसंपदा तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजूशेठ जानकर यांनी धनगर समाज बांधवांना तातडीने लस देण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती.

जानकर म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरानाने बळी जाणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. वाढत्या कोरोनामुळे हातावर पोट असणाऱ्या मेंढपाळ धनगर समाज बांधवांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मेंढपाळ धनगर समाजबांधवांची संख्या आहे. वर्षातील आठ महिने मेंढपाळ गावातून बाहेर पडून भटकंती करीत असतात. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन मेंढपाळ धनगर समाज बांधवांना तातडीने कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी मागणी राजूशेठ जानकर यांनी केली होती.

त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी मेंढपाळ धनगर समाज बांधवांना लस देण्यासाठी शासन पातळीवर तातडीने निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली.