शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू योजनेचे पाणी दुधेभावी तलावाकडे

By admin | Updated: May 18, 2016 00:16 IST

नागज परिसरात उत्साह : शेतकऱ्यांना फायदा

ढालगाव : टेंभू योजनेचे पाणी नागज ओढ्यातून पुढे दुधेभावी तलावाकडे गतीने मार्गस्थ झाले असून, त्यामुळे नागज, निमज, कदमवाडी, घोरपडी, शिंदेवाडी, चोरोची, जांभुळवाडी, ढोलेवाडी, चुडेखिंडी, दुधेभावी, ढालगाव, आदी गावांत उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.टेंभू उपसा सिंचन योजनेअंतर्गत कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी सोडण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तीन आठवडे यांनी पाणी बंद होते. त्यामुळे उद्घाटने झाली, पाणीपूजन झाले, मात्र पाणी कुठाय? असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जाऊ लागल्याने चंद्रकांत हाक्के यांनी खा. संजय पाटील यांच्या माध्यमातून टेंभू योजनेचे अधिकारी गुणाले, प्रशांत कडूसकर यांच्यासोबत बैठक घेऊन नागजच्या ओढ्यात तातडीने पाणी सोडावे, अशी भूमिका घेतली. परंतु हे पाणी पाठीमागे सातारा, कराड, सांगोला तालुक्यात ज्या शेतकऱ्यांची पैसे भरले होते, त्यांना देण्यात आले होते. ज्या शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरली होती, त्यांना पाणी देणे हे प्राधान्यक्रमाने गरजेचे होते. खासदार संजय पाटील यांनी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगुल यांच्याशी चर्चा करून ढालगाव विभागात पिण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे, हे पटवून दिले. त्यानंतर सातारा जिल्ह्याची पिण्यासाठी पाणी देण्यास अडचण नाही, असे सांगितल्यानंतर टेंभूच्या अधिकाऱ्यांनी सांगलीच्या बैठकीनंतर गतीने यंत्रणा मार्गी लावली. पाणी पुन्हा कवठेमहांकाळ तालुक्याकडे मार्गस्थ केले. ते नागज येथील बेलवण ओढ्यातून नागज, निमज असे दुधेभावी तलावाच्या दिशेने मार्गस्थ झाले व गुरूवारपर्यंत ते दुधेभावी तलावात पोहोचले, असे चंद्रकांत हाक्के यांनी सांगितले.ढालगावरून परिसरातील दहा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मिटेलच, परंतु काही गावे या पाण्याच्या पात्राशेजारी आहेत, येथील शेतीलाही पाणी मिळणार असल्याचे हाक्के म्हणाले. (वार्ताहर)