शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेनेजअभावी मोकळ्या जागेत सांडपाणी

By admin | Updated: May 20, 2016 23:38 IST

गव्हर्न्मेंट कॉलनी : महापालिका होऊनही समस्या कायम; रस्ते, गटारींपासून वंचित

सांगली : ग्रामपंचायतीची नगरपालिका झाली, महापालिका झाली, तरी गव्हर्न्मेंट कॉलनी, सहयोगनगर, पद्मावतीनगर, हसनी आश्रम, स्वप्ननगरी, वृंदावन व्हिला परिसर अजूनही विकासापासून वंचित आहे. काही समस्या सुटल्या असल्या तरी, सांडपाण्याचा निचरा करणारी व्यवस्थाच नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.मोकळ्या प्लॉटमध्ये साचलेले सांडपाणी, काटेरी झुडपांचे जंगल, रस्त्यांची दुरवस्था, कचरा उठावास होणारा विलंब... अशा कित्येक समस्यांनी हा परिसर त्रस्त झाला आहे. शुक्रवारी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमात या परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्यांना वाचा फोडली. सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या या परिसरात समस्याही तितक्याच आहेत. अनेकांनी प्लॉट खरेदी केले, पण पुन्हा ते त्याकडे फिरकलेच नाहीत. आज या मोकळ्या प्लॉटमध्ये काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातून अपार्टमेंटची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ड्रेनेज व्यवस्था नसल्याने अपार्टमेंटमधील सांडपाणी अशा मोकळ्या प्लॉटमध्ये सोडले जाते. काहीवेळा तर ते सांडपाणी रस्त्यावरून जात असते. या परिसरात शुद्ध पाणीही येत नाही. पाण्यात तुरटी फिरविली तर गाळ दिसून येतो. अनेक रस्त्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. कचरा कुंड्यांची स्वच्छता होत नाही. काही भागात घंटागाडी आठवड्यातून दोनदाच येते. स्फूर्ती चौकात पावसाचे पाणी घरांत शिरते. सर्व्हे नंबर १३३ ते १३५ मध्ये रस्त्याचे आरक्षण पडले आहे. तिथे ३० ते ४० वर्षापासून लोक राहत आहेत. मोकाट जनावरांचाही नागरिकांना त्रास होतो. रात्रीच्यावेळी साप रस्त्यावरून फिरत असतात. रस्ते रुंदीकरणही प्रलंबित आहे, अशा अनेक तक्रारी व समस्या नागरिकांनी मांडल्या.