शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील नागरिकांवर वाॅर्ड समित्यांचा वाॅच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:33 IST

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात गृह अलगीकरणातील रुग्णही घराबाहेर पडत आहेत. परजिल्ह्यांतूनही शहरात ...

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात गृह अलगीकरणातील रुग्णही घराबाहेर पडत आहेत. परजिल्ह्यांतूनही शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर वाॅच ठेवण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी बुधवारी वाॅर्ड समितीला दिले.

कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने आयुक्त कापडणीस यांनी वाॅर्ड समित्यांना अलर्ट केले आहे. वॉर्डातील नागरिक अनावश्यक कामांसाठी बाहेर जाणार नाहीत तसेच वॉर्डात येणार नाहीत याची दक्षता घ्या. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत नागरिकांची गर्दी होणार नाही, याबाबत उपाययोजना करा, अशा सूचना दिल्या आहेत.

वॉर्डात होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना दैनंदिन भेटी द्या. रुग्ण होम आयसोलेशनच्या नियमांचे पालन करीत आहेत किंवा नाही याची खात्री करा. नियमांचे उल्लंघन करणार्‍या रुग्णांना कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करा, असे निर्देश दिले आहेत. वॉर्डातील दूध, भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरविणार्‍या आस्थापनांची यादी फोन नंबरसह नागरिकांना माहितीसाठी प्रसिद्ध करावी.

वॉर्डात विनामास्क फिरणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी. वॉर्डातील मंगल कार्यालयात गर्दीचे व कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही याबाबत दक्ष रहा. उल्लंघन केल्यास कारवाई करा. अत्यावश्यक सेवेतील दुकानांमध्ये मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा भंग करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी. परगावाहून, परराज्यांतून आलेल्या नागरिकांची दिनांकनिहाय नोंदी ठेवा. ते चौदा दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहतील याची नियमित तपासणी करा. लसीकरण केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या समन्वयाने प्रभागातील पात्र व्यक्तींचे लसीकरण करून घ्या. लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही याबाबत नियोजन करा. वॉर्डातील जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर्स यांचा होम आयसोलेशन रुग्ण तपासणी, लसीकरण कामात उपयोग करून घ्या, अशा सूचना दिल्या आहेत.