आजकाल जिकडेतिकडे जाहिरातींचा भडीमार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी आपले हक्क जाणून घेणे गरजेचे आहे.
सुरक्षेचा हक्क : प्रत्येक ग्राहकाला वस्तू विकत घेण्यापूर्वी त्यांच्या गुणवत्तेबाबत तसेच त्या वस्तूवर मिळणाऱ्या सेवांबाबत आग्रही राहण्याचा ग्राहकाला पूर्ण अधिकार आहे.
माहितीचा हक्क : एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळविणे हा ग्राहकांचा हक्क आहे.
निवड करण्याचा अधिकार : बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा ग्राहकाला अधिकार आहे.
म्हणणे मांडण्याचा हक्क : जर ग्राहकाला वाटत असेल फसवणूक झाली आहे, तर तुम्हाला तुमचं म्हणणं योग्य ठिकाणी मांडण्याचा पूर्ण हक्क आहे.
तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा हक्क : जर ग्राहकाची फसगत झाली असेल तर त्याला तक्रार नोंदविण्याचा हक्क आहे.
ग्राहकांनी आपले हक्क काय आहेत, हे नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ग्राहकांना काही गोष्टी माहीत असायला हव्यात. कोणत्याही हॉटेलमध्ये आपण मोफत पाणी पिऊ शकता किंवा स्वछतागृहाचा वापर करू शकता. सुटे पैसे नाहीत म्हणून दुकानदार तुम्हाला गोळ्या, चॉकलेट देऊ शकत नाही. दिलेले वचन न पाळल्यास कंपनीवर कारवाई होऊ शकते. शैक्षणिक संस्थांनी गुणवत्तेचे निकष न पाळल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्यास कारवाई होऊ शकते. प्रत्येक वस्तू विकत घेताना ग्राहकाने योग्य ती खबरदारी व काळजी घेतली पाहिजे.
- राजश्री बाळासाहेब गोसावी
उपाध्यक्ष सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस
बहादुरवाडी ता. वाळवा जि. सांगली