शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंतदादा’साठी निविदांची प्रतीक्षा

By admin | Updated: May 1, 2017 00:27 IST

दोनच दिवस मुदत : शेवटच्या दिवशी अर्ज दाखल होण्याची शक्यता

सांगली : वसंतदादा साखर कारखाना भाडेतत्त्वाने घेण्यासाठी अद्याप एकही निविदा दाखल झालेली नाही. निविदा दाखल करण्यासाठी दोनच दिवसांची मुदत शिल्लक राहिल्याने बँकेला निविदाधारकांची प्रतीक्षा लागली आहे. ३ मे रोजी शेवटच्या दिवशी इच्छुक कारखान्यांकडून अर्ज दाखल होण्याची चिन्हे दिसत आहेत. थकीत ९३ कोटी रुपयांच्या कर्जापोटी सांगली जिल्हा बँकेने वसंतदादा कारखान्याचा ताबा घेतला आहे. याच कर्जाच्या वसुलीसाठी कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याचा निर्णय बँकेने घेतला होता. त्यासंदर्भातील निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. कारखान्याचा भाडेकरार किती वर्षासाठी असावा, याचा निर्णय निविदाधारकांवर सोपविला आहे. कमीत कमी कालावधित जास्तीत जास्त भाडे देणाऱ्या संस्थेला प्राधान्याने कारखाना देण्याचे धोरण यामागे आहे. प्राप्त निविदा कोणतेही कारण न देता स्वीकारण्याचा आणि नाकारण्याचा अधिकार बँकेने स्वत:कडे राखून ठेवला आहे. वसंतदादा कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ७ हजार ५00 टन आहे. कारखान्यासह डिस्टिलरी, इथेनॉल, अ‍ॅसिटालडिटाईड, अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड, अ‍ॅसिटिक अनहायड्रॉईड, कंट्रीलिकर बॉटलिंग, यंत्रसामग्री, वापरातील इमारती, गोदामे व अन्य मालमत्ताही भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील जवळपास १२ साखर कारखान्यांनी वसंतदादा कारखाना चालविण्यास घेण्याबाबत यापूर्वी रस दाखविला होता. यामध्ये कर्नाटकातील रेणुका शुगर, उगार शुगर, शिवशक्ती शुगर, संकेश्वर कारखाना, अथणी शुगर, सांगली जिल्ह्यातील क्रांती व राजारामबापू सहकारी साखर कारखाना, सातारा जिल्ह्यातील सह्याद्री साखर कारखाना यांचा समावेश होता. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर यातील काही मोजक्याच कारखान्यांनी जिल्हा बँकेशी चर्चा केली. यामध्ये व्यंकटेश्वरा पॉवर्स, दालमिया शुगर, राजारामबापू कारखान्याचा समावेश आहे. प्रत्यक्षात एकही निविदा अद्याप दाखल झालेली नाही. त्यामुळे निविदाधारकांची प्रतीक्षा बँकेला लागली आहे. (प्रतिनिधी)३ मेपर्यंत अंतिम मुदतनिविदा दाखल करण्यासाठी ३ मेपर्यंत अंतिम मुदत आहे. दाखल निविदा ८ मे रोजी उघडण्यात येणार आहेत. मे महिन्यात हा कारखाना नव्या संस्थेकडे जाणार आहे. कारखाना चालविण्यास देताना शेतकरी, कामगार, सभासद, वित्तीय संस्था, शासकीय कार्यालये यांच्या देण्यांचा विषय चर्चेला येणार आहे. त्यामुळे या सर्व घटकांचे लक्ष निविदा प्रक्रियेकडे लागले आहे.