शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

कडेगाव तालुक्यात गावाेगावचे रस्ते अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:19 IST

शासनस्तरावर ग्रामविकास विभागाकडून मिळणाऱ्या चाैदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतील २५ टक्के रकमेतून पथदिव्यांचे वीजबिल भरण्याची तरतूद आहे. ...

शासनस्तरावर ग्रामविकास विभागाकडून मिळणाऱ्या चाैदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतील २५ टक्के रकमेतून पथदिव्यांचे वीजबिल भरण्याची तरतूद आहे. ही २५ टक्के रक्कम कपात करून घेऊनच जिल्हा परिषदेने उर्वरित ७५ टक्के रक्कम ग्रामपंचायतींकडे वर्ग केली आहे. राज्य शासन व जिल्हा परिषदेकडून महावितरणकडे ही रक्कम भरलेली नसल्याने महावितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा बंद करण्याची मोहीम उघडली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेकडून मात्र याबाबत ग्रामपंचायतीना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचे वीज बिल भरण्यासाठी शासन स्तरावर ग्रामविकास विभागाकडून अंदाजपत्रकामध्येच वित्त आयोगाच्या निधीतच तरतूद केली जाते. ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेली रक्कम पथदिव्यांच्या बिलासाठी महावितरणकडे परस्पर दिली जाते. परंतु वीज बिलाची थकबाकी कोट्यवधी रुपयांच्या घरात गेली आहे. त्यामुळे महावितरणने ग्रामपंचायतींना कोणतीही सूचना न देता एकापाठोपाठ एक ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचे कनेक्‍शन तोडण्याची मोहीम उघडली आहे. कडेगाव तालुक्यातील अनेक गावांच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा ताेडला आहे. त्यामुळे गावांमधील प्रमुख रस्ते अंधारात बुडाले आहेत. वीज कनेक्‍शन तोडल्यामुळे गावपातळीवरून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. वीजबिल भरण्याची जबाबदारी ग्रामविकास विभागाची व जिल्हा परिषदेची आहे. ही वीजबिलाची रक्कमही खूप मोठी आहे. १० लाखांपासून १ कोटींपर्यंतची बिले महावितरणने ग्रामपंचायतीकडे दिली आहेत. त्याचे सविस्तरपणे विवरण मात्र दिलेले नाही. महावितरणने वीज तोडल्यामुळे सद्यस्थितीत तालुक्यातील बहुतांशी सर्व गावे अंधारात आहेत. त्यामुळे तेथे अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच चोऱ्यांची भीतीही व्यक्त केली जात आहे.

चौकट :

‘ती’ रक्कम शासनाकडे की जिल्हा परिषदेकडे?

चाैदावा वित्त आयोग सुरू झाला तेव्हापासून या निधीतील २५ टक्के रक्कम पथदिव्यांच्या बिलासाठी कपात करून घेऊन उर्वरित ७५ टक्के रक्कम ग्रामपंचायतींकडे वर्ग केली जाते. कपात केलेली २५ टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडे आहे की राज्य शासनाकडून येणार आहे, याबाबत ग्रामपंचायतींना कोणतीही अधिकृत माहिती नाही.