शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

सांगली जिल्ह्यात १0१ गावात ‘एक गाव, एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 21:47 IST

‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यंदाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षिस घेतल्यानंतर अनेक गावे या उपक्रमातून बाहेर पडली आहेत.

सांगली, दि. 25 -  जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यंदाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षिस घेतल्यानंतर अनेक गावे या उपक्रमातून बाहेर पडली आहेत. यंदा केवळ जिल्ह्यातील १०१ गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ‘एक गाव, एक गणपती’ बसविला आहे.  जिल्हा प्रशासव पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविला जात आहे. गणेशोत्सवातील खर्च कमी व्हावा, वर्गणीची कोणावर सक्ती होऊ नये, लोकवर्गणीतून जमा झालेल्या रक्कम गावाच्या विधायक कामासाठी खर्च व्हावी, गाव म्हटले की गट-तट आले. मग गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत मारामारी होऊ नये, पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी व्हावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविला जात आहे.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान सुरु झाल्यानंतर या उपक्रमाचा अनेक गावांनी स्विकार केला. मात्र बक्षिस घेतल्यानंतर बहुतांश गाव उपक्रमातून बाहेर पडल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. दोन वर्षापूर्वी १४० गावात हा उपक्रम राबविला. गतवर्षी हा आकडा ९६ होता. यामध्ये यंदा वाढ झाली आहे. तंटामुक्त अभियानाय जिल्ह्याने २००८०९ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्यावेळी २४५ गावात ‘एक गणपती’ बसला होता.  २०१० मध्ये तब्बल ३०२ गावांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. पण त्यानंतर ही संख्या घटतच आहे. पोलिस प्रबोधन करुनही आजची पिढी एकमेकांवर इर्शा करण्यासाठी स्वतंत्रपणे मंडळाची स्थापना करुन गणेशाची प्रतिष्ठापना करीत आहेत.  पोलिस ठाणे निहाय आकडेवारीसांगली ग्रामीण : ३मिरज ग्रामीण : ५क.महांकाळ : १४जत : ४उमदी : ६आटपाडी : १८विटा : १४कडेगाव : ४ चिंचणीवांगी : २कुंडल : ५भिलवडी : १तासगाव : २कुरळप : १शिराळा : ६आष्टा : ३कोकरुड : १०इस्लामपूर : २एकूण : १०१

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव