शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

त्या दृष्याने पतंगरावांना कर्तव्यपूर्तीचा आनंद

By admin | Updated: May 25, 2016 00:19 IST

वडियेरायबाग बंधारा तुडुंब : ऐन दुष्काळात येरळा नदी प्रवाही

प्रताप महाडिक-- कडेगाव  -कडेगाव : तालुक्यातील वडियेरायबाग येथे येरळा नदीवर बांधलेला कोल्हापूर पध्दतीचा बंधारा ऐन दुष्काळात तुडुंब भरलेला आहे. हे नयनरम्य दृष्य पाहून माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम आनंदाने भारावून गेले. या विधायक कामात मोलाचा वाटा उचलल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आपल्या राजकीय कारकीर्दीत विधायक कामांचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या या नेत्याला कर्तव्यपूर्तीचा आनंद वाटला. ताकारीचे पाणी येरळा नदीत सोडल्यामुळे ऐन दुष्काळात येरळा प्रवाही झाली. आनंदी क्षण आपल्या अवतीभोवतीच रेंगाळत असतात. परंतु ते क्षण टिपण्याची दृष्टी असावी लागते. आमदार पतंगराव कदम शिवणीहून वडियेरायबागला निघाले होते. वडियेरायबाग गावालगत येरळा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या भिंतीवरून गाडी निघाली असताना त्यांनी चालकाला गाडी थांबविण्यास सांगितले. त्यांनी गाडीतून उतरून तुडुंब भरलेला बंधारा पाहिला आणि वडियेरायबागला एका कार्यकर्त्याला भेटायला गेले. वडियेरायबाग येथे गेल्यावर कार्यकर्त्यांशी बोलताना ते म्हणाले, मी जलसंधारणमंत्री असताना हा बंधारा मंजूर केला. भूमिपूजन आणि उद्घाटनही मीच केले. आता हा तुडुंब भरलेला बंधारा पाहून खूप आनंद वाटला. घाटमाथ्यावरील कायम दुष्काळी भागात हरितक्रांती झाली. या योजनांसाठी मी सातत्याने पाठपुरावा केला. मुख्य कालवे, पोटकालवे आणि वितरिकाद्वारे शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर पाणी आले. टेंभूच्या पाण्याने नांदणी आणि ताकारीच्या पाण्याने येरळा या दोन नद्या खळखळ वाहत आहेत. ओढ्या-नाल्यामधूनही पाण्याचा प्रवाह सुरू आहे. इच्छापूर्तीचे खूप समाधान वाटल्याचे सांगून त्यांनी मनातील आनंद व्यक्त केला.