शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

जिल्ह्यातील ‘फिक्सिंग’मध्ये विट्याच्या सदाभाऊंचा बळी

By admin | Updated: May 19, 2016 00:26 IST

संजय पाटील : संघर्षाला घाबरत नाही; विट्यात गौप्यस्फोट

विटा : लोकसभा निवडणुकीत मला लोकांनी निवडून दिले. परंतु, मी राजकीय चौकटीत अडकून राहत नाही. कारण व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा व पक्षापेक्षा समाज मोठा आहे. त्यामुळे जिल्ह्याचा मालक कोणीही असो, मी संघर्षाला घाबरत नाही. समाजासाठी काम करीतच राहणार आहे, असे सांगून, जिल्ह्यात फिक्सिंगचे राजकारण चालते. विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या त्या फिक्सिंगच्या राजकारणाचेच माजी आमदार सदाशिवराव पाटील बळी ठरले आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी केला.येथे आदर्श संकुलाच्या नोकरी मेळाव्यात खासदार पाटील बोलत होते. या कार्यक्रमास सदाशिवराव पाटील, नगराध्यक्ष वैभव पाटील आदी उपस्थित होते. मी सदाभाऊंच्या कार्यक्रमास येतो, म्हणून काहींना शंका येते. परंतु, राजकारणाच्या पलीकडेही संबंध असतात. मला गेल्या पाच ते सहा वर्षापूर्वी सदाभाऊंनी, सर्वांशी संघर्ष करू नका, असा सल्ला दिला होता. पण संघर्ष जन्मजातच असल्याने तो मी टाळू शकत नाही, असे खा. पाटील यावेळी म्हणाले.दुष्काळाशी सामना करणाऱ्या पालकांनी मुलांना मोठ्या अपेक्षेने उच्च शिक्षण दिले आहे. त्यामुळे मुलांकडून पालक व समाजाच्याही मोठ्या अपेक्षा आहेत. भविष्य उज्ज्वल होण्यासाठी त्यांना चांगल्या कंपनीत नोकरी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून वैभव पाटील यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याचे खा. पाटील म्हणाले.नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी प्रास्ताविक केले. आतापर्यंत ३ हजार ७०० मुलांनी नोंदणी केली असून, त्यातील ३ हजार २०० मुलांच्या प्रत्यक्ष मुलाखती होऊन ८१० मुलांची नियुक्ती झाली असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास कार्यकारी संचालक पी. टी. पाटील, कॅम्पस संचालिका कु. पूजा पाटील, उपनगराध्यक्ष अ‍ॅड. सचिन जाधव, मिलिंद भागवत, प्रमोद शहा, विलास पवार, राहुल रास्कर, अविनाश चोथे, प्रताप सुतार उपस्थित होते. (वार्ताहर)