शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

नेत्यांच्या जिरवाजिरवीत आटपाडीचा बळी

By admin | Updated: January 2, 2015 00:09 IST

राजकीय संघर्ष कुणासाठी : ९२ कोटींच्या पाणी योजनेवरून नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप

अविनाश बाड -आटपाडी -खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात एकवेळचा अपवाद वगळता, कायम खानापूर तालुक्यातील नेतृत्वाला विधानसभेत नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. ज्या भागात सत्ता, त्या भागाचा विकास, हे सूत्र खानापूर आणि विसापूर मंडलाच्या तुलनेत आटपाडी तालुक्याच्या मागासलेपणावरून स्पष्ट होते. आता ९२ कोटींच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेवरून आ. अनिल बाबर आणि जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांचे एकमेकावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नेत्यांच्या एकमेकांच्या जिरवाजिरवीच्या राजकारणात आटपाडी तालुक्याचा मात्र कायमच बळी दिला जात आहे. याबद्दल तालुकावासीयांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.जिल्ह्यात पहिला टॅँकर ज्या आटपाडी तालुक्यात सुरू केला जातो, तो तालुका कायमस्वरूपी टॅँकरमुक्त होईल, अशी आशा ९२ कोटींच्या तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेमुळे निर्माण झाली. कृष्णा नदीतून धनगाव येथून थेट आटपाडी तालुक्यातील ५३ गावांना शुध्द पिण्याचा पाणीपुरवठा करणारी ही योजना आहे. या योजनेचे कामही प्रत्यक्षात सुरू झाले असून १० टक्के काम झाले आहे. दि. ४ डिसेंबर रोजी आ. अनिल बाबर यांनी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सादीगले यांची भेट घेतली. त्यावेळी बाबर यांनी या योजनेला विरोध केल्याचे वृत्त आले. त्यानंतर त्यावर ही योजना ज्यांनी खूप प्रयत्नांनी पदरात पाडून घेतली, त्या अमरसिंह देशमुख यांनी बाबर यांच्यावर जोरदार टीका केली. आता बाबर यांचे म्हणणे आहे की, मी आटपाडी तालुक्यातीलच जांभुळणी आणि नेलकरंजी गावच्या किरकोळ पाणी योजनेच्या कामांसाठी भेट घेतली. पाणी योजनेला विरोध केलाच नाही.या सगळ्या संशयकल्लोळामुळे तालुकावासीय मात्र बुचकळ्यात पडले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अमरसिंंह देशमुख यांनी बाबर यांच्यावर सदाशिव पाटील यांच्या तुलनेत अधिक टीकेची झोड उठविली होती. आताही देशमुख यांनी बाबर यांचे टॅँकरचा ठेका घेणारे आणि टॅँकर चालविणाऱ्या बगलबच्च्यांसाठी विरोध केल्याचा आरोप केला होता. यावर बाबर म्हणतात, टॅँकरमुक्तीचे काम त्यांनी त्यांच्या गावापासूनच सुरू केले आहे. २०१३ चा भीषण दुष्काळ तालुकावासीयांनी अनुभवला आहे. त्यावेळी कुणाचे पिण्याच्या पाण्याचे टॅँकर होते, कुणाच्या जनावरांच्या छावण्या होत्या, कुणी पिण्याच्या पाण्याच्या पैशावर डल्ला मारला आणि कुणी कुणी छावण्यांतील जनावरांच्या तोंडातील घास खिशात घातला, हे सगळे तालुकावासीयांना माहीत आहे. आटपाडी तालुक्याचा दुष्काळ कायमचा संपू नये, यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. ही मंडळी जीवघेण्या दुष्काळापेक्षा तालुक्याचे खरे शत्रू आहेत. कृष्णा नदीतून करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या श्रेयाबाबत नेतेमंडळींमध्ये बाद होणे समजण्यासारखे आहे. आ. बाबर अतिशय अभ्यासू नेते आहेत. अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची त्यांची खास पध्दत आहे. पण आटपाडी तालुक्याच्यादृष्टीने या योजनेबाबत वाद निर्माण होणे हे सुध्दा दुर्दैवीच आहे.ँमग जातील टँकर कुणीकडे ?२०१३ च्या जीवघेण्या दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील अनेकांनी मुंबईतून जुने टॅँकर खरेदी केले आणि तालुक्याला पाणी पाजले. पाऊस पडल्यापासून हे सर्व टॅँकर आता उभे आहेत. ज्यांच्यात धमक आहे, ज्यांना पुढारी आणि सरकारी बाबूंची फिल्डिंग लावायला जमली, त्यांनी ट्रकमधील टाकी काढून वाळू वाहतूक सुरू केली. पण वाळू वाहतूक करणे पाणीपुरवठ्यापेक्षा खूप कठीण काम आहे. त्यामुळे या मंडळींचा पाणीपट्टीच्या नावाखाली पाणी योजनेला छुपा विरोध असल्याची चर्चा आहे. त्यामुळे टॅँकर लॉबीला साथ देणाऱ्या नेत्यांच्या भूमिकेवरच योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.