शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

वसंतदादांच्या वारसदारांची संघर्ष एक्स्प्रेस

By admin | Updated: April 28, 2015 23:45 IST

जिल्हा बँक निवडणूक : विधानसभा, लोकसभा, कारखान्यानंतर आता बँकेत आमने-सामने--जिल्हा बँक निवडणूक

अविनाश कोळी - सांगली  --वसंतदादा घराण्यातील सत्तासंघर्षाची कहाणी जुनी आहे. विधानसभा, लोकसभा, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना अशा अनेक निवडणुकांमध्ये एकमेकांशी लढलेले वारसदार आता याच परंपरेचा भाग म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत आमने-सामने आले आहेत. दादा घराण्यातील फुटीचा मुद्दा या निवडणुकीत केंद्रस्थानी आल्याने, या निवडणुकीची चर्चा आता राज्यभर सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळ माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा प्रभाव राहिला. त्यांच्याभोवतीच कॉँग्रेस पक्षातील राजकारण फिरत राहिले. निष्ठावंतांबरोबरच बंडखोरांचा, स्वकियांच्या कुरघोड्यांचा अनुभव दादांनी व कॉँग्रेसनेही घेतला. संघर्षाची ही कहाणी स्वातंत्र्यानंतर लगेचच कॉँग्रेसच्या वाट्याला आली. वसंतदादांच्या घराण्यातील छुपा संघर्ष जुना असला तरी, १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत तो चव्हाट्यावर आला. त्यानंतर लोकसभा, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना असा प्रवास करीत हा संघर्ष आता जिल्हा बॅँकेपर्यंत आला आहे. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत आता मदन पाटील आणि विशाल पाटील हे दोन्ही चुलत बंधू एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. संघर्ष करूनही दादा घराण्यातील वारसदार अनेक कार्यक्रमांमध्ये पक्षीय राजकारणात, निवडणुकांत एकत्रही असतात. अशावेळी दादा घराण्यात कोणताही संघर्ष नसल्याचे वारंवार सांगण्यासही ते कमी पडत नाहीत. लोकसभा निवडणुकीत सुरुवातीच्या काळात मदन पाटील प्रचारात उतरले नव्हते. तेव्हाही या संघर्षाची जोरदार चर्चा सुरू होती. अल्पावधितच मदन पाटील प्रचारात उतरले आणि त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीतही प्रतीक पाटील यांच्या भूमिकेबद्दल मदन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी साशंकता व्यक्त केली होती. २०१४ च्या निवडणुकीतही काही काळ मागील विधानसभा निवडणुकीचे पडसाद उमटले होते. शंकेच्या कुंपणातच दादांच्या वारसदारांमधील एकीची चर्चा केली जाते. प्रतीक पाटील, विशाल पाटील आणि मदन पाटील यांच्या बंधूंमधील संघर्षाला जिल्हा बॅँकेच्या निमित्ताने तोंड फुटले आहे. मदन पाटील हे वसंतदादांच्या विचारांचेही वारसदार नाहीत, अशी टीका विशाल पाटील यांनी नुकतीच केली. विशाल पाटील यांनी एका बाजूने मदन पाटील यांच्यावर टीका सुरू केली असताना, मदन पाटील शांत आहेत. त्यांनी अद्याप यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. तरीही विशाल पाटील यांच्याविरोधात लढण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. विचारांचा वारसा दोन्हीकडे असला तरी, संघर्षाची परंपराही या वारसदारांना लाभली आहे. त्यामुळेच टप्प्या-टप्प्यावर हे वारसदार आपसात लढण्याची संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. दादा घराण्यात यानिमित्ताने पडलेली फूट आता जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय बनली आहे. या चर्चेभोवतीच आता राजकारणही रंगले आहे. दादा घराण्यातील दोन वारसदार एकमेकांविरोधात लढत असल्याने जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचेही लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. अशी आहे परंपरा संघर्षाची...१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसतर्फे प्रकाशबापू पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्याचवेळी मदन पाटील यांनी बंडखोरी केली. चुलते-पुतणे एकमेकांच्या विरोधात मैदानात आले. उघडपणे मैदानात येण्याची ही कहाणी तशीच सुरू राहिली. १९९८ नंतर दादा घराण्यातील दोन कुटुंबांच्या वाटा वेगळ्या झाल्या. विष्णुअण्णांचे कुटुंब राष्ट्रवादीत, तर प्रकाशबापूंचे कुटुंब कॉँग्रेसमध्ये राहिले. त्यामुळे १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाशबापू व मदन पाटील पुन्हा आमने-सामने आले. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही प्रकाशबापू व विष्णुअण्णा या दोघांनी वेगवेगळी पॅनेल उभी करून एकमेकांना आव्हान दिले होते.शंका-कुशंकाविधानसभा, लोकसभा निवडणुकीत कोणालाही उमेदवारी मिळाली, तरी घराण्यातील अंतर्गत छुप्या संघर्षाचा मुद्दा चर्चेला येतोच. दोन्ही कुटुंबांमधील नेत्यांच्या प्रत्येक कृतीवरून संशयकल्लोळही निर्माण होतो. २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर या वारसदारांमधील हालचालींना शंका-कुशंकांचे ग्रहण लागले, ते अजून कायम आहे.