शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर द्या

By admin | Updated: September 17, 2014 23:04 IST

थकित देणी द्या : कामगार युनियन सभेत ठराव; नियोजनशून्य कारभारामुळे डबघाई

सांगली : आजपर्यंतच्या संचालक मंडळाच्या निष्क्रिय व नियोजनशून्य कारभारामुळेच कारखाना डबघाईला आला असून, आता चांगल्या कारभारासाठी वसंतदादा साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी द्या, असा ठराव आज (बुधवार) येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना कामगार युनियनच्या (इंटक) वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी इंटकचे अध्यक्ष श्रीकांत देसाई होते. येथील साखर कामगार भवनमध्ये ही सभा झाली. यावेळी कार्याध्यक्ष घन:शाम पाटील, विकास पाटील, पतंगराव मुळीक आदी उपस्थित होते. अध्यक्ष देसाई यांनी कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात यावा, असा ठराव मांडला. याला सर्व कामगारांनी टाळ्या व घोषणा देऊन मंजुरी दिली. यावेळी देसाई म्हणाले की, मदन पाटील, प्रतीक पाटील व त्यानंतर विशाल पाटील यांनी पारदर्शीपणे कधीच कारखाना चालवला नाही. योग्य नियोजनाच्या अभावामुळेच कारखान्याची अवस्था बिकट झाली आहे. यावर्षी कारखाना सुरू होतो किंवा नाही याबाबत संभ्रमावस्था आहे. संचालक मंडळाने याबाबत कोणतेही नियोजन केलेले दिसत नाहीत. वसंतदादांनी उभे केलेले हे मंदिर चालले पाहिजे, हीच प्रत्येक कामगारांची इच्छा आहे. कामगार सध्या हलाखीचे जीवन जगत आहे, मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही. कारखाना चालला नाही, तर कामगारांची चूल पेटणार नाही, मात्र संचालक, सभासदांचे काहीही बिघडणार नाही. कारखाना तुम्हाला व्यवस्थित चालवता येत नसेल, तर तो थर्ड पार्टीला (भाडेतत्त्वावर) चालवण्यास द्यावा. कामगार काम करण्यासाठीच आहे, मात्र त्याचा थकित पगार आधी दिला पाहिजे. गेल्या दहा वर्षांपासून कामगारांची थकित देणी मिळवण्यासाठीच युनियन प्रयत्न करीत आहेत. कारखाना अध्यक्षांकडून कामगारांमध्ये दिशाभूल करण्याचेच प्रयत्न आहेत. अशावेळी त्यांनी एकी दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कार्याध्यक्ष घन:शाम पाटील म्हणाले की, व्यवस्थापनानेच कामगारांना देशोधाडीला लावले आहे. कामगारांत भांडणे लावण्याचे उद्योग सुरू आहे. उच्च न्यायालयाने कामगारांची थकित देणी देण्याचा आदेश देऊन तो पाळला गेलानाही. यावेळी कामगारांनी थकित पगार दिल्याशिवाय काम सुरू करायचे नाही, अशी मागणी युनियनकडे केली. स्वागत पतंगराव मुळीक यांनी केले. यावेळी प्रदीप शिंदे, अशोक साळुंखे, रमेश पाटील, शिवाजी पाटील, यशवंत शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)५आर. बी. शिंदेंची अनुपस्थितीकामगार नेते आर. बी. शिंदे यांच्या अनुपस्थितीत कामगार युनियनची ही सभा होती. सभेपूर्वी त्यांना आदरांजली अर्पण करून सभेला प्रारंभ करण्यात आला. त्यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच कामगार युनियनची वाटचाल यापुढेही सुरू राहील, असे प्रतिपादन अध्यक्ष श्रीकांत देसाई यांनी केले.