शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा कारखान्यासाठी २२ टक्के मतदान

By admin | Updated: May 23, 2016 00:19 IST

कारखाना सभासदांमध्ये निरुत्साह : केंद्रे पडली ओस, आजपर्यंतच्या नीच्चांकी मतदानाची नोंद

सांगली : केवळ सहा जागांसाठीच झालेल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानादिवशी रविवारी सभासदांमध्ये प्रचंड निरुत्साह दिसून आला. एकूण २२.१७ टक्के एवढे आजवरचे सर्वात कमी मतदान नोंदले गेले. उद्या (सोमवारी) मिरजेतील शेतकरी भवनात मतमोजणी होणार आहे. संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांपैकी १५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तीन गटांमध्ये तीन अतिरिक्त उमेदवारांचे अर्ज असल्याने सहा जागांसाठी निवडणूक झाली. सांगली व अनुसूचित जाती जमाती गटात ज्या उमेदवारांचे अर्ज राहिले होते, त्यांनी पुन्हा सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे या निवडणुकीत केवळ औपचारिकता राहिली होती. त्यामुळे सभासदांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. वसंतदादा कारखान्याची सध्याची मतदारसंख्या ३५ हजार २३९ इतकी आहे. सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव या चार गटातील सभासदांची संख्या ३५ हजार १००, व्यक्ती सभासद ४२ आणि संस्था सभासद ९७ अशांचा समावेश आहे. मतदानादिवशी सकाळपासूनच केंद्रांवर शांतता होती. सकाळी ८ ते दुपारी ४ अशी मतदानाची वेळ होती. सकाळी दहा वाजेपर्यंत केवळ ३ टक्के मतदान नोंदले गेले. दुपारी १२ वाजेपर्यंत १०.७३ टक्के, २ वाजेपर्यंत १६.७७ टक्के, तर सायंकाळी चार वाजेपर्यंत २२.१७ टक्के मतदान झाले. एकूण ३५ हजार १०० मतदारांपैकी केवळ ७ हजार ७८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक मतदान सांगलीतील आठ केंद्रांवर झाले. याठिकाणी २९.६१ टक्के एकूण मतदान झाले. कारखाना कार्यक्षेत्रात सर्वात कमी मतदान तासगावमध्ये केवळ १६.३६ टक्के नोंदले गेले. मिरजेतही १६.७८ टक्के मतदान झाले. मतदारांमध्ये प्रचंड निरुत्साह दिसून आला. अनेक केंद्रे ओस पडली होती. (प्रतिनिधी)विलासराव शिंदेंसह अनेकांना बाहेर काढलेमतदान करण्यासाठी सहा प्रकारच्या ओळखपत्रांची अट घालण्यात आली होती. यामध्ये कारखान्याच्या सभासद ओळखपत्राचा समावेश नव्हता. त्यामुळे आष्टा येथील केंद्रात विलासराव शिंदे, सांगलीवाडीचे नगरसेवक पांडुरंग भिसे यांच्यासह दोघांना मतदान करण्यास मज्जाव केला. केंद्रांपासून मतदारांचे घर लांब असल्याने अशा अनेक मतदारांना मतदान करता आले नाही. सांगली केंद्रावरही असा अनुभव अनेकांना आला. मतमोजणी आज मिरजेतील मार्केट यार्डमधील शेतकरी भवनात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. २० टेबलांवर मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. याठिकाणी २५० कर्मचारी नियुक्त केले आहेत.सांगलीत वसंतदादा कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, प्रा. शरद पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.