शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लसीकरणासाठी केंद्र वाढविण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:27 IST

सांगली : येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली ...

सांगली : येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली असून ॲपवर नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्ह्यात लसीकरण केंद्रांची संख्या १०० ने वाढविण्यात येणार आहे. जिल्ह्यात १८० लसीकरण केंद्रांतून लसीकरणाचे नियोजन आहे.

केंद्र सरकारच्यावतीने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन प्रशासकीय करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून मात्र याबाबतच्या मार्गदर्शक सूचना अद्याप तरी आल्या नाहीत. तरीही तयारी करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात उपकेंद्र स्तरावर लसीकरण करण्यात येणार आहे. त्याची संख्या १८० पर्यंत नेण्याचे नियोजन आहे.

१ मेपासून लसीकरण माेहीम राबविताना केवळ आरोग्य विभागाकडून न राबविताना ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामसुरक्षा समितीचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. सर्वांत मोठ्या वयोगटाला लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याने गर्दी होण्याची शक्यता असल्याने सर्वांच्या सहभागाने नियोजन करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंच आणि इतरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधत सहभागाचे आवाहन केले आहे.

कोविन ॲपवर नोंदणी सुरू होणार आहे. २८ पासून ही नोंदणी सुरू होण्याची शक्यता असलीतरी याबाबत अधिकृत माहिती प्रशासनाकडे नव्हती.

कोट

एक मेपासून जिल्ह्यात लसीकरणासाठी होणारी वाढती गर्दी लक्षात घेता, लसीकरणासाठी केंद्र वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. वाढविलेल्या केंद्रातून लसीकरण करण्यात येणार आहे.

डॉ. विवेक पाटील, जिल्हा लसीकरण अधिकारी