शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
3
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
4
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
5
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
6
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
7
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
8
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
9
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
10
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
11
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
12
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
13
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
14
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
15
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
16
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
17
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
18
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
19
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
20
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा

गैरसोयींच्या विळख्यात पशुधनाची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2015 00:20 IST

जत तालुक्यातील स्थिती : दोन लाख जनावरांची उपेक्षा, गैरसोयीमुळे पशुपालक त्रस्त

गजानन पाटील - संख -जिल्ह्यामध्ये विस्ताराने मोठा असलेला जत तालुका हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. दुष्काळामुळे शेतीतून शाश्वत उत्पन्नाची खात्री नसल्याने पशू व कुक्कुटपालन हा येथील प्रमुख जोडधंदा बनला आहे. तालुक्यात सहा लाखाहून अधिक पशूंची संख्या आहे. मात्र येथील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यांची अवस्था अगदी केवीलवाणी बनली आहे. जिल्हास्तरावर याबाबत माहिती असूनही याकडे अगदी सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ २ लाख २४ हजार ८२४ हेक्टर इतके आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्र १ लाख ५८ हजार ७०० हेक्टर आहे. त्यापैकी खरीप क्षेत्र ६५ हजार ७० हेक्टर, तर रब्बीचे क्षेत्र २३ हजार ३८० हेक्टर आहे. तालुक्यातील एकूण बागायती क्षेत्र २२ हजार ७५ हेक्टर, तर जिरायत क्षेत्र ६२ हजार २९९ हेक्टर आहे. खिलार जनावरांसाठी व माडग्याळ जातीच्या मेंढीसाठी हा तालुका प्रसिद्ध आहे. भूमिहीन शेतमजूर, ऊसतोडणी मजूर शेळी पाळतो. शेळीला गरिबाची गाय म्हणतात. तिच्या पालनासाठी कमी खर्च लागतो. खुरटे गवत आणि काटेरी वनस्पतीवर तिचे पोषण होते. देखणी खिलार गाय आणि देखणा खोंड हे दुष्काळी माणदेशाचे वैभव आहे. जातीवंत देखणी, चपळ, काटक, अत्यंत चिवट आणि प्रचंड रोगप्रतिकारक शक्ती असणारी खिलार जनावरे प्रसिद्ध आहेत. खरीप व रब्बी हंगामातील ज्वारी, बाजरी, मका या पिकांचा कडबा जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरला जातो. शेतीला शेणखताची गरज आहे. त्यामुळे शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो. आर्थिक अर्थव्यवस्था पशूंवर आधारित बनली आहे. बाजारामध्ये बैल, खोंड, बोकड यापासून मोठे आर्थिक उत्पन्न मिळते. तालुक्यामध्ये एकूण जनावरांची संख्या ६ लाख १० हजार ६०५ इतकी आहे. त्यामध्ये बैल, गाई ८८ हजार ९०५, म्हैशी ६२ हजार १३९, शेळ्या १ लाख ३० हजार ३९५, मेंढ्या ७७ हजार ९७६, कोंबड्या २ लाख ५१ हजार १९० इतक्या आहेत. पशुंच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे २३ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यामध्ये श्रेणी १ चे १४ दवाखाने व श्रेणी -२ चे ९ आहेत. श्रेणी १ मध्ये दरीबडची, जत, उमदी, सोन्याळ, येळवी, कुंभारी, बोर्गी, सनमडी, संख, आवंढी, उमराणी, वज्रवाड, माडग्याळ, बाज असे १४ दवाखाने, तर श्रेणी - २ मध्ये वाळेखिंडी, शेगाव, डफळापूर, अंकले, मुचंडी, बिळूर, तिकोंडी, वळसंग, कोंतेवबोबलाद असे ९ दवाखाने आहेत. पण येथील सुविधा मात्र बेभरवशाच्या ठरत असल्याचे चित्र आहे.जत तालुका अजूनही सर्वच क्षेत्रात अन्य तालुक्यांच्या तुलनेत विकासासाठी झगडतोय... बेभरवशाची शेती, तर दुसरीकडे पशुपालनात वाढत चाललेल्या समस्या, यामुळे शेतकरी व पशुपालक मेटाकुटीला आला आहे. पशूंचे आरोग्य राखणारे व त्यांना संरक्षण देणारे पशुवैद्यकीय दवाखाने शो पीस बनले आहेत. अनेक दवाखान्यात ना डॉक्टर, ना सुसज्ज इमारती, ना मुबलक औषधे. हजारो जनावरांच्या आरोग्याचा भार नेहमीच प्रभारी... अशा परिस्थितीत पशुवैद्यकीय दवाखाने व पर्यायाने पशूंची होणारी परवड, यावर प्रकाश टाकणारी मालिका आजपासून...२०१२ ची पशुगणना दफ्तरदिरंगाईत पशुसंवर्धन विभागातर्फे दर पाच वर्षांनी पाळीव जनावरांचे सर्वेक्षण करून त्यांची संख्या मोजण्यात येते. २००७ मध्ये पशुगणना करून त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. २०१२ ची पशुगणना होऊन तीन वर्षे पूर्ण होऊनसुद्धा अद्याप तालुकानिहाय पशुगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. ती लालफितीच्या दफ्तरदिरंगाईत धूळ खात पडली आहे. पशुंची निश्चित संख्या नसल्याने वैद्यकीय सुविधा, लसीकरणासह विविध कामांचे नियोजन करण्यात अडचणीचे ठरत आहे. माडग्याळ येथील शेळ्या-मेंढ्यांच्या बाजाराला सुमारे ५० वर्षांची परंपरा आहे. शुक्रवारच्या या बाजारात शेळ्या-मेंढ्यांची मोठी खरेदी-विक्री होते. माडग्याळ मेंढीसाठी या बाजाराची ख्याती सर्वदूर आहे. जत येथे गुरुवारी शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरतो. कोट्यवधींची उलाढाल होते. बाजार समितीत शेळ्या-मेंढ्यांची झालेली आवक व विक्रीवर्षआवक नगविक्री नग सरासरी दर २०१२-१३३३,५००१८,८०० ३,००० रु२०१३-१४३३,०००२२,०००३,५०० रु.