शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यात बुडून दोन बहिणींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : तालुक्यातील करोली (एम) येथे शेततळ्यात बुडाल्याने जिजाबाई सतीश वाघ (वय १३), केशवनी सतीश वाघ (६) या दोन सावत्र बहिणींचा मृत्यू झाला. जिजाबाई व केशवनी या शनिवारी सायंकाळी शेतात जळण आणण्यासाठी गेल्या असता, शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली.करोली (एम) येथील वाघमारे वस्तीवर राहणाºया जिजाबाई ...

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : तालुक्यातील करोली (एम) येथे शेततळ्यात बुडाल्याने जिजाबाई सतीश वाघ (वय १३), केशवनी सतीश वाघ (६) या दोन सावत्र बहिणींचा मृत्यू झाला. जिजाबाई व केशवनी या शनिवारी सायंकाळी शेतात जळण आणण्यासाठी गेल्या असता, शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली.करोली (एम) येथील वाघमारे वस्तीवर राहणाºया जिजाबाई व केशवनी या सावत्र बहिणी शनिवारी शाळेतून घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे सायंकाळी पाच वाजता जळण आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. सतीश वाघ यांची अर्धा एकर द्राक्षबाग असल्याने त्यांनी शंभर फूट लांब व रूंद शेततळे खोदले आहे. शेततळ्यात प्रथमच पाणी सोडले असल्याने दोघी बहिणी शेतात जळण आणण्यासाठी गेल्यानंतर शेततळे पाहण्यासाठी गेल्या; मात्र काठावरून पाणी पाहताना शेततळ्यात घसरून पडल्याने दोघींचा बुडून मृत्यू झाला.मुलींची आई स्नेहा वाघ या जनावरे चारण्यासाठी गेल्या होत्या. वडील सतीश वाघ कामानिमित्त मिरजेला गेले होते. घरात आजोबा एकटेच होते. सायंकाळी सात वाजेपर्यंत दोघीही घरी परत आल्या नसल्याने आई-वडिलांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. शेततळ्यात पाहिले असता सुमारे पाच फूट पाण्यात दोघींचे मृतदेह तरंगत असल्याचे आढळले. जिजाबाई ही मणेराजुरी कन्या शाळेत आठवीत, तर केशवनी वस्तीवरील शाळेत दुसरीत शिकत होती.पशुपालन व शेती करणाºया सतीश वाघ यांची गरीब परिस्थिती असून, त्यांना एक मुलगा व दोन मुली होत्या. दोघी मुलींच्या आकस्मिक मृत्यूमुळे वाघ कुटुंबियांवर मोठा आघात झाला. दोघींचे मृतदेह सापडल्यानंतर माता-पित्याचा आक्रोश सुरू होता. दोन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलीसपाटील मनीषा पाटील यांनी ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक मोहन जाधव, हवालदार भिंताडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत ग्रामीण पोलिसात नोंद आहे.