शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत दोन दुकानदारांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेने दोन दुकानांवर कारवाई करत २० हजार रुपयांचा दंड केला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेने दोन दुकानांवर कारवाई करत २० हजार रुपयांचा दंड केला तसेच भाजी मंडईत विनामास्क फिरणाऱ्या १३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

आयुक्त नितीन कापडणीस यांनी लाॅकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करण्यावर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. महापालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून सध्या कारवाईचा धडाका सुरू आहे. शुक्रवारी शहरात दोन दुकानदारांनी संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. दुकानदाराला प्रत्येकी दहा हजारांचा दंड करण्यात आला. पेठभाग येथील भाजीमंडईत विनामास्क फिरणाऱ्या १३ जणांकडूनही दंड वसूल करण्यात आला. सहायक आयुक्त अशोक कुंभार, शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, किशोर कांबळे व प्रणिल माने यांनी ही कारवाई केली.

चौकट

नियमांचे पालन न केल्यास कारवाई : आयुक्त कापडणीस

कोरोना रुग्णांची संख्या वाढत आल्याने शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन नियमांचे सर्वांनी पालन करावे. सकाळी ७ ते ११ या कालावधीत शासनाने परवानगी दिलेले व्यवसाय सुरू ठेवावेत. या नियमांचे अनेक आस्थापना उल्लंघन करताना आढळून येत असून त्यांच्यावर महापालिका आणि पोलिसांच्या पथकाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे सर्वच आस्थापनांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला.