शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांचा औषधसाठा जप्त

By admin | Updated: July 22, 2014 23:14 IST

जीवनदायी योजना : अन्न व औषध प्रशासनाने केली कारवाई, औषधे बंद झाल्याने रुग्णांचे हाल

सांगली : राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत रुग्णांना देण्यात येणाऱ्या मोफत औषधांचा बेकायदा साठा केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने आज (मंगळवार) येथील शासकीय रुग्णालयातील दोन लाखांची औषधे जप्त करून ती सील केली. दरम्यान, कालपासून या योजनेतील लाभार्थी रुग्णांंना ही औषधे देणे बंद झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील रुग्णांंना मोफत उपचार व औषधांचा पुरवठा केला जातो. मात्र या औषधांसाठी शासकीय रुग्णालयात पैसे घेत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. योजनेच्या औषधांचा बेकायदा साठा सांगली व मिरजेच्या शासकीय रुग्णालयात केल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारपासून अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकण्यास सुरुवात केली. सोमवारी मिरजेच्या शासकीय रुग्णालयातून ५ लाख ८६ हजारांची औषधे जप्त करून ती सील करण्यात आली. त्यानंतर कालपासून सांगलीतील शासकीय रुग्णालयातील औषध साठ्याची तपासणी सुरू होती. आज सायंकाळपर्यंत सुमारे दोन लाखांची औषधे जप्त केल्याची माहिती अन्न निरीक्षक जयश्री सौंदत्ते यांनी दिली. सौंदत्ते यांनी सांगितले की, योजनेतील औषधांचा साठा करता येत नाही. करायचा असल्यास त्याची अन्न व औषध प्रशासनाकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. या औषधांचा साठा करून त्यांची विक्री केल्याचा संशय आहे. बेकायदा साठा सापडला असून, यातील औषधांची विक्री झाली आहे का, याची तपासणीही सुरू आहे. औषधे विक्री झाल्याच्या अद्याप तक्रारी नाहीत. जप्त आणि सील केलेल्या औषधांचा अहवाल आम्ही सहाय्यक आयुक्तांना देणार आहोत. दरम्यान, कालपासून या योजनेतील रुग्णांना औषधे देण्याचे बंद झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. सांगली व मिरजेच्या शासकीय रुग्णालयातील कर्करोग, भाजलेल्या, डायलेसीसवरील गरीब रुग्णांंना औषधे मिळणे बंद झाल्याने ती आता विकत घेण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)