शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

कुचीजवळ ट्रक-दुचाकी अपघातात दोन ठार

By admin | Updated: August 23, 2015 00:37 IST

कुचीजवळ ट्रक-दुचाकी अपघातात दोन ठार

कवठेमहांकाळ : मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर कुची (ता. कवठेमहांकाळ) फाट्याजवळ रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकून दोघे ठार झाले. संभाजी महादेव पाटील (वय २०, जुजारपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर) व सचिन ऊर्फ संभाजी बापू लोखंडे (३५, घोरपडी, ता. कवठेमहांकाळ) अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्री बारा वाजता झाला. मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर कुची गावानजीक टायर फुटल्याने एमएच ४५-९१६ क्रमांकाचा ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला होता. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सचिन लोखंडे व संभाजी पाटील मिरजेहून आपल्या गावी जुजारपूर व घोरपडीला दुचाकीवरून (एमएच १० एजे २२३१) निघाले होते. रात्रीची वेळ असल्याने व रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी थांबलेल्या ट्रकवर पाठीमागून आदळली. ही धडक इतकी जोराची होती की, दोघेही रस्त्यावर उडून पडले. या अपघातात सचिन लोखंडे जागीच ठार झाला, तर संभाजी पाटील गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी साडेआठ वाजता त्याचा मृत्यू झाला. हवालदार नामदेव देवकते अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)