शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कामेरी येथे सांडपाण्याच्या कारणातून दोन कुुटुंबांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:33 IST

इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे सांडपाण्याच्या पाइपमधील पाणीगळतीच्या कारणातून दोन कुटुंबात हाणामारी झाली. यामध्ये दोन्हीकडील चौघे जखमी झाले. ...

इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे सांडपाण्याच्या पाइपमधील पाणीगळतीच्या कारणातून दोन कुटुंबात हाणामारी झाली. यामध्ये दोन्हीकडील चौघे जखमी झाले. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत दोन्ही कुटुंबांनी पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.

विकास साताप्पा कांबळे याने दिलेल्या फिर्यादीत त्यांच्या घराशेजारी सुभाष सुरुपा कांबळे हा त्याच्या कुटुंबासह राहण्यास आहे. सांडपाण्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबांत वारंवार तक्रारी झाल्या आहेत. मंगळवारी दुपारी सुभाष कांबळे याने विकास कांबळे याच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. सांडपाण्याच्या पाइपची गळती काढली आहे, त्यामुळे विनाकारण शिवीगाळ करू नका, असे सांगत असताना, सुभाष कांबळे याने त्याच्या हातील खुरपे विकास कांबळे याच्या डाव्या कानाच्या पाठीमागे मारून त्याला मारून गंभीर जखमी केले. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या विकास यांची पत्नी नंदा कांबळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सीमा सुभाष कांबळे, लक्ष्मी जयकर कांबळे, सोनाली सुभाष कांबळे, पौर्णिमा शरद रणभिसे, साक्षी शरद रणभिसे, स्नेहल शरद रणभिसे, जयकर सुभाष कांबळे आणि सुभाष सुरुपा कांबळे अशा सर्वांविरुद्ध गंभीर दुखापतीसह गर्दी मारामारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पौर्णिमा रणभिसे यांनी दिलेल्या फिर्यादीत सांडपाण्याच्या गळतीच्या कारणावरूनच विकास कांबळे याने त्याच्या हातीतील खुरप्याने वडील सुभाष कांबळे यांच्या डाव्या कानाजवळ मारून जखमी केले. पौर्णिमा रणभिसे या भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता, सुुनील विकास कांबळे याने शिवीगाळ केली, तर विकास कांबळे याने खुरप्याने उजव्या हाताच्या पंज्यावर वार केला. नातेवाइकांनी हे भांडण सोडविल्यावर दोघांनी पलायन केले. विकास कांबळे आणि सुनील कांबळे यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.