शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वांगीत दोन एकर ऊस जळाला

By admin | Updated: November 12, 2014 22:56 IST

शॉर्टसर्किटमुळे आग : शेतकऱ्यांचे अडीच लाखाचे नुकसान

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे शॉर्टसर्किटने दोन एकर ऊस जळाला. आगीत दोन लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वांगी येथील आरफळ कालव्याजवळ येरळा नदीकाठावर शंकरराव माधवराव पाटील व हणमंत रामचंद्र मोहिते यांचा ऊस आहे. शंकरराव पाटील यांच्या उसात विजेचे खांब आहेत. विद्युत पंपांना वीज पुरवठा करणाऱ्या वीजवाहक तारा याठिकाणी लोंबकळत असल्याने आज दुपारी एकच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन शंकरराव पाटील यांच्या उसाने पेट घेतला. तसेच जवळच असणाऱ्या हणमंत मोहिते यांच्या उसानेही पेट घेतला. उसाने पेट घेतल्याचे अर्जुन मोहिते यांनी पाहिले. याची माहिती त्यांनी ऊस मालकांना दूरध्वनीवरून दिली. राजेंद्र पाटील यांनी सोनहिरा कारखान्याच्या अग्निशमन गाडीला बोलावून आग विझविण्यात आली. शंकरराव पाटील यांच्या दोन एकरापैकी एक एकर ऊस जळाला, तर हणमंत मोहिते यांचा एक एकर ऊस जळाल्याने अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. येरळा नदीकाठावर मोठ्या प्रमाणात ऊसक्षेत्र आहे. सोनहिरा कारखान्याच्या अग्निशमन गाडीने आग आटोक्यात आणल्यामुळे शेकडो एकर ऊस आगीपासून वाचला आहे. (वार्ताहर)महावितरणच्या प्रशासनाचे दुर्लक्षवीजवाहक तारा बऱ्याच ठिकाणी लोंबकळत आहेत. मोठमोठ्या झाडांच्या फांद्यांमधून तारा गेल्यामुळे अनेकवेळा शॉर्टसर्किट होत आहे. लोंबकळत असणाऱ्या तारा व्यवस्थित करून घ्याव्यात, तसेच झाडांच्या फांद्या तोडून तारा रिकाम्या कराव्यात, अशी मागणी करूनही वीज कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे.