शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बेवनूरमध्ये बावीस दिवसांतून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 23:38 IST

परिसरात तीव्र टंचाई : गावे, वाड्या-वस्त्यांवर ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

शेगाव : बेवनूर (ता. जत) येथे टँकरच्या खेपा होत नसल्यामुळे गावामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. आजुबाजूच्या गावांसह वाड्या-वस्त्यांवर व गावात २२ दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. अधिग्रहण केलेल्या विहिरीचे अंतर व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावापासून सहा किलोमीटरवर असलेल्या गुळवंची तलावात पाणी आले आहे. तेथूनच पेयजल योजनेतून नळपाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडले आहे.जतच्या उत्तरेला सांगोला, कवठेमहांकाह तालुक्याच्या सीमेला असलेल्या बेवनूर गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी जुनी विहीर कोरडी पडल्याने सहा महिन्यांपासून टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. सुरुवातीला दोन टँकरच्या खेपा मंजूर होत्या. पाणी कमी पडू लागले म्हणून ग्रामस्थांच्या मागणीनुसार तीन खेपा मंजूर आहेत. पाण्यासाठी गुळवंची येथे खासगी विहीर अधिग्रहण करण्यात आली.गावापासून जास्त अंतर, यानियमित वीजपुरवठा, भारनियमन यामुळे दिवसभरातील खेपा पूर्ण होत नाहीत. फक्त एक-दोन खेपा होत आहेत. गावाखालील ११ वाड्या-वस्त्या व गावाला पाणीपुरवठा कमी होत आहे मात्र दुसऱ्या बाजूला अधिग्रहण केलेल्या विहिरीतील पाणी अगोदरच दुसऱ्याला विकले जाते. त्यामुळे टँकर लवकर भरला जात नाही. त्यामुळे दिवसभरातील खेपा पूर्ण होत नाहीत. तसेच कागदोपत्री टॅँकरच्या खेपा दाखविल्या जात आहेत. पाणी असून सुद्धा गावातील विहीर अधिग्रहण केली नाही, असा आरोप ग्र्रामस्थांतून केला जात आहे. गुळवंची येथील विहीर अधिग्रहण केली आहे. गावापासून अंतर जास्त आहे. अनियमित वीजपुरवठा व भारनियमन यामुळे दिवसभरात तीन खेपाही पूर्ण होत नाहीत. २०-२२ दिवसांतून पाणी पुरवठा होत आहे. शिंदे वस्ती, शेख, सरगर, लिंबाचा मळा, टेकड मलमे या वाड्या-वस्त्यांवर अपुरा पाणी पुरवठा होत आहे. (वार्ताहर)