शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

बत्तीस गुंठ्यात टोमॅटोचे पंचवीस लाखाचे उत्पन्न

By admin | Updated: June 30, 2016 23:34 IST

बेळंकीच्या शेतकऱ्याची यशोगाथा : नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास करून घडविली किमया... --महाराष्ट्र कृषिदिन विशेष

मोहन मगदूम--लिंगनूर --टोमॅटोचे दर चढेच असल्यामुळे उत्पादक खूश आहेत. बेळंकी (ता. मिरज) येथील प्रयोगशील शेतकऱ्यास ३२ गुंठे क्षेत्रातील टोमॅटो तब्बल पंचवीस लाखाचे उत्पन्न देत आहे.मेहनत, बाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजन केल्यास शेतीवर येणाऱ्या संकटांवर मात करता येते, हे बेळंकीच्या सुखदेव कोरे या प्रगतशील शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. त्यांनी केवळ ३२ गुंठे क्षेत्रात आतापर्यंत वीस लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. यापुढे अजून पाच लाखाचे उत्पन्न मिळण्याचा विश्वास त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. विशेष म्हणजे कोरे यांनी हे उत्पन्न मिळवले आहे, ते खडकाळ माळरानावरील जमिनीतून! त्यासाठी आधुनिक शेतीपद्धत आणि शेडनेटचा वापर फायदेशीर ठरला आहे.बेळंकीपासून पाच किलोमीटरवर असलेल्या माळरानावर कोरे यांची वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. त्यांना सुरुवातीस शेतीतून फारसे उत्पादन मिळाले नाही. पाण्याची कमतरता आणि अपुरे भांडवल याचा फटका बसत होता. मात्र त्यांनी शेतीत प्रयोग करणे सुरू ठेवले. सुरुवातीला एक एकर ढबू मिरचीची लागवड केली. त्यावेळी बाजारभाव पडल्याने जेमतेम उत्पादन मिळाले. मग मार्च महिन्यात ३२ गुंठे जमिनीत ठिबक व मल्चिंग पेपरचा वापर करून टोमॅटोची लागवड केली. पाच फुटावर सरी व दहा इंच अंतरावर रोप याप्रमाणे नऊ हजार रोपांची लावण केली. उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा फटका अनेकांना बसला, पण कोरे यांनी मल्चिंग पेपर व शेडनेट या तंत्रज्ञानाचा वापर करून टोमॅटो वाचवण्यात यश मिळवले. गेल्या तीन आठवड्यांपासून तोडणी हंगाम सुरू झाला आहे. गेल्या पंधरवड्यात कोल्हापूर, इचलकरंजी, सांगलीच्या बाजारपेठेत टोमॅटो पाठवण्यात आला. सुरुवातीस ५० रुपयेप्रमाणे दर मिळाला. आता मुंबई, अहमदाबाद बाजारपेठेत टोमॅटो पाठवण्यात येत आहे. तेथेही ७० ते ८० रुपये दर मिळाला. सध्या दर थोडा कमी झाला आहे. एकूण ७० टन उत्पादन निघण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यातून पंचवीस लाखाचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.कोरे यांनी दुसऱ्या ३० गुंठ्याच्या क्षेत्रात ढबूची लागण केली असून त्याला चांगली मागणी आहे. गतवर्र्षी ढब्बूला पाच रुपये किलो दर मिळाला होता. दर घसरले म्हणून निराश न होता त्यांनी नव्या जोमाने परत ढबूची लागण केली आहे. सध्या त्याचा दर ४५ ते ५० रुपयेपर्यंत आहे.बत्तीस गुंठे क्षेत्रात टोमॅटोची लावण करून जास्तीत जास्त उत्पादन व दर घेण्यात यशस्वी झालो. बाजारपेठेचा अभ्यास व पिकाची काळजी घेतल्यास शेतकऱ्याला निश्चित फायदा होतो. - सुखदेव कोरे, टोमॅटो उत्पादक, बेळंकी