शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बारा ग्रामपंचायती अजूनही अंधारातच

By admin | Updated: May 24, 2016 00:49 IST

प्रशासनाचेही दुर्लक्ष : डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला ब्रेक

रत्नागिरी : एकीकडे खेडी इंटरनेटने जोडली जात असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायती अंधारात आहेत. कारण स्वातंत्र्यानंतरही या ग्रामपंचायतींमध्ये अजूनही वीजजोडणी झालेली नाही़ आता खेडोपाडी मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर होत आहे़ त्याचबरोबर ग्रामपंचायतीही इंटरनेटने जोडल्यामुळे एका क्लिकवर कोणतीही माहिती काही सेकंदात उपलब्ध होते़ जग एवढे पुढे गेलेले असताना जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये वीज पुरवठा जोडलेला नाही़विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपये शासनाकडून दिले जातात़ त्यातून अनेक ग्रामीण भागाचा विकास साधला जातो़ आता ग्रामपंचायतींमध्ये विविध योजना राबविल्या जात असताना प्रत्येक ग्रामपंचायतींचे संगणकीकरण करण्यात येत आहे़ कारण विविध प्रकारचे दाखले ग्रामपंचायतींच्या माध्यमातून देण्यात येत आहेत़ त्याचबरोबर विवाह नोंदणीही ग्रामपंचायतींमध्येच करण्यात येत आहे. अशा प्रकारे ग्रामपंचायत ही गावच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरलेली असतानाच जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतींमध्ये अद्यापही वीज जोडणी नाही़या ग्रामपंचायतीेंच्या माध्यमातून विविध विकास कामे राबविली जात आहेत़ मात्र, ग्रामपंचायतींमध्ये वीज नसल्याने पावसाळ्याच्या दिवसांत सरपंच, ग्रामसेवक यांना अनेकदा आंधारामध्ये काम करावे लागते़ त्यामुळे एकीकडे संगणक युग सुरु असतानाच जिल्ह्यातील ग्रामपंचायती अजूनही वीजेपासून दूर आहेत. त्यामुळे या संगणक युगात या ग्रामपंचायतीमध्ये वीज नसल्याने संबंधित विभागाचा विकास कसा साधणार, असा प्रश्न उपस्थित आता ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)1विकासकामांवर परिणाम : मागणी करूनही कानाडोळाग्रामपंचायतींकडून करण्यात येणाऱ्या विकासकामांची ई-निविदा काढण्यात येते. त्यानंतरच ही विकासकामे मार्गी लावण्यात येतात. काही ग्रामपंचायती विजेविना असल्याने त्यामध्ये संगणकांचा वापर कसा करणार, इंटरनेट सेवा नसल्याने त्याचा विकासकामांवरही परिणाम होत आहे. संगणक सेवा उपलब्ध झाली असली तरीही वीज नसल्याने अडचण झाली आहे.