शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

वाठारजवळ तिहेरी अपघात; सहा जखमी

By admin | Updated: June 15, 2015 00:18 IST

दुपारी तीन वाहनांचा भीषण अपघात

मलकापूर : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाठार (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत रविवारी दुपारी तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. रस्त्यावर थांबलेल्या नादुरुस्त ट्रकला टँकर व त्यापाठोपाठ कारने धडक दिली. या अपघातात सहाजण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धैर्यशील बजरंग पाटील (वय ३५, रा. कामेरी, ता. वाळवा), श्वेता मोहन सुतार (१६), ओमकार मोहन सुतार, शुभम मोहन सुतार (तिघेही, रा. पणुंब्रे, ता. शिराळा), मारुती अप्पा लोखंडे, राधिका उत्तम मोरे (दोघेही, रा. जयसिंगपूर) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रेशनिंगचे धान्य घेऊन कोल्हापूरला निघालेला ट्रक नादुरुस्त झाल्याने रविवारी दुपारी चालकाने वाठार गावच्या हद्दीत महामार्गावरच थांबविला होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या दूध टँकर (एमएच १० एडब्ल्यू ७४७४)वरील चालकाचा ताबा सुटल्याने टँकरची महामार्गावर थांबलेल्या ट्रकला जोराची धडक बसली. दरम्यान, टँकरच्या पाठोपाठ चंदूर (ता. हातकणंगले) गावाला निघालेल्या कारची अपघातग्रस्त टँकरला धडक बसली. अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांसह महामार्ग देखभाल विभागाचे गजानन सकट, अमोल भिसे, अर्जुन सूर्यवंशी, राजू खैरे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी टँकरसह कारमधील जखमींना बाहेर काढले. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्यांपैकी टँकरचालकासह सोळा वर्षीय मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातानंतर काहीवेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे. (प्रतिनिधी)