शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

कुसुमताई नायकवडी यांना वाळव्यात आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST

ओळ : वाळवा येथे कुसुमताई नायकवडी यांच्या स्मृतिस्थळी संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी अभिवादन केले. लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा ...

ओळ : वाळवा येथे कुसुमताई नायकवडी यांच्या स्मृतिस्थळी संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी अभिवादन केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाळवा : वाळवा येथील हुतात्मा शिक्षण व उद्योगसमूहाच्या नेत्या कुसुमताई नागनाथ नायकवडी यांच्या ८९व्या जयंतीदिनी त्यांचे पुत्र व संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी कारखाना कार्यक्षेत्रावरील स्मृतिस्थळी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.

हुतात्मा शिक्षण व उद्योगसमूहातील सर्व संस्था, साखर कारखाना, दूध संघ, महालक्ष्मी शेतकरी उत्पादन कंपनी, बँक, बझार, हुतात्मा नागरी व साखर कारखाना आणि दूध संघ कामगार पतसंस्था, जिजामाता विद्यालय, हुतात्मा विद्यालय, नाना पाटील महाविद्यालय (वाळवा), बाबूराव कोकाटे विद्यालय (पडवळवाडी), क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी विद्यालय (शिरगाव), नागनाथअण्णा अकॅडमी, अरुणभैय्या अकॅडमीत कुसुमताई नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबूराव बोरगावकर, दूध संघाचे उपाध्यक्ष भगवान पाटील, बझारच्या कार्यवाह नंदिनी नायकवडी, अध्यक्ष दिनकर बाबर, उपाध्यक्ष संपत पाटील, सरपंच डाॅ. शुभांगी माळी, डाॅ. अशोक माळी, उपसरपंच पोपट अहिर, जिजामाताच्या मुख्याध्यापिका व्ही. के. चेंडके, हुतात्माचे मुख्याध्यापक मधुकर वायदंडे, नाना पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या व जिल्हा परिषद सदस्या डाॅ. सुषमा नायकवडी, अजित वाजे, गंगाराम सूर्यवंशी, बाजीराव मांगलेकर, विश्वास मुळीक, शिवाजी पाटील उपस्थित होते. हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, स्नेहल नायकवडी, नंदिनी नायकवडी, डाॅ. सुषमा नायकवडी व कुटुंबीयांनी सूर्योदयानंतर पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी कोरोना पार्श्वभूमीवर लागू असलेल्या सर्व नियमांचे काटेकाेर पालन करण्यात आले.