शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

झाडे पडली, खांब कलले, तारा तुटल्या

By admin | Updated: May 28, 2014 00:51 IST

वादळी पाऊस : वाहनांचे नुकसान, वीजपुरवठा खंडित, घरांवरील पत्रे, कौले उडाली, संसार उघड्यावर

सांगली : अवकाळी वादळी पावसाने जिल्हाभर पडझड होऊन मोठी हानी झाली. जिल्ह्याच्या विविध भागात झाडे पडून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विजेच्या तारा तुटल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. मोहितेवडगाव येथे वादळी वार्‍याने लाकडी खांब डोक्यात पडून एकजण जखमी झाला आहे. वादळी पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. सांगली शहर परिसराला आज (मंगळवार) वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने झोडपले. सुमारे तासभर झालेल्या पावसाने चार ठिकाणी झाडे व फांद्या तुटून पडल्या. शास्त्री चौक, कोल्हापूर रस्ता येथे झाडे वाहनांवर पडल्याने मोटारीसह दुचाकीचे नुकसान झाले. वादळी वारा सुटताच शहरातील वीजपुरवठा सुमारे पाऊण तास बंद करण्यात आला होता. दुपारी दोनच्या सुमारास वादळी वार्‍याला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. सुमारे तासभर पाऊस झाला. यामुळे दत्त-मारुती रोड, स्टेशन चौक, शिवाजी मंडई, न्यायालय परिसर आदी ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजयनगर येथील शहरी बस थांब्यानजीक झाड उन्मळून पडले. कोल्हापूर रस्त्यावरील एसटीच्या प्रशासकीय कार्यालयासमोर ‘रेन ट्री’ उन्मळून मोटारीवर पडले. यामुळे मोटारीचे नुकसान झाले. शास्त्री चौकात असलेल्या झाडाची फांदी तुटून दोन दुचाकीवर पडल्याने दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले. जिल्हा परिषदेसमोर असलेल्या झाडाची फांदी तुटून पडल्याने चहाची टपरी उद्ध्वस्त झाली. (प्रतिनिधी)