शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

वेळेत उपचार घ्या, कोरोनावर मात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST

सांगली : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे कोरोनाची बाधा झाल्यानंतर लगेच घाबरून न जाता त्यातून ...

सांगली : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे कोरोनाची बाधा झाल्यानंतर लगेच घाबरून न जाता त्यातून बरे होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. कोरोनापासून बचावासाठी आवश्यक त्या खबरदारी घेण्याबरोबरच वेळेत उपचार घेतले तर कोरोनावर मात करणे शक्य आहे, असा विश्वास जिल्हा टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केला.

कोरोनाविषयी जनतेत असलेले संभ्रम दूर करण्यासाठी गुरुवारी डॉक्टरांनी पत्रकारांशी संवाद साधत आपले विचार मांडले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी उपस्थित होते.

चौकट

रेमडेसिविरचा निर्णय डॉक्टरांना घेऊ द्या

डॉ. सोमनाथ मगदूम व डॉ. अविनाश झळके यांनी सांगितले की, रेमडेसिविर इंजेक्शन दिले म्हणजे रुग्णाचा प्राण वाचेल या गैरसमजामुळे प्रत्येक रुग्णाला इंजेक्शन द्यावे यासाठी नातेवाइकांचा आग्रह असतो. परंतु, हे औषध ‘लाईफ सेव्हिंग ड्रग’ नाही. त्यामुळे ते कोणत्या रुग्णाला द्यायचे हे डॉक्टरांना ठरवू द्यावे. नातेवाइकांनी हे औषध रुग्णाला द्यावे यासाठी स्वत:हून डॉक्टरांवर दबाव टाकू नये. निदान झाल्यानंतर पहिल्या नऊ दिवसांत याचा वापर फायदेशीर ठरतो.

चौकट

सरसकट एचआरसीटी नको

डॉ. आनंद मालाणी यांनी एचआरसीटीबाबत म्हणाले, कोरोनामुळे या टेस्टचा बेसुमारपणे वापर करण्यात येत आहे. प्रत्येक कोरोना रुग्णाला एचआरसीटी स्कॅनिंगची गरज नसते. जे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत, ज्यांचा ऑक्सिजन कमी होत नाही तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना एचआरसीटीची गरज नाही. ऑक्सिजन कमी होत असल्यासच डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करून घ्यावी.

चौकट

योग्य वेळीच सीटी स्कॅन करा

डॉ. विनोद परमशेट्टी म्हणाले, कोरोनाचे निदान झाल्यानंतर अनेक रुग्ण पहिल्या, सातव्या, चौदाव्या दिवशी असे वारंवार एचआरसीटी स्कॅनिंग करून घेत असल्याचे दिसून येत आहे. मुळात याची काहीही गरज नाही. जे रुग्ण कोरोना उपचारासाठी आयसीयूमध्ये होते, या कालावधीत ज्यांना ऑक्सिजन दिला गेला, जे व्हेंटिलेटरवर होते, अशा रुग्णांनी २८ दिवसांनंतर सिटी स्कॅन करून घ्यावे.

चौकट

होम आयसोलेशनमध्ये सकारात्मक हवी

डॉ. अमृता दाते यांनी होम आयसोलेशनबद्दल सांगितले की, होम आयसोलेशनमध्ये बऱ्या होऊ शकणाऱ्या रुग्णांनी हॉस्पिटलमधील बेड अडवून ठेवू नयेत. कोरोनाचे ९० टक्के रुग्ण हे घरी थांबून योग्य ती खबरदारी घेऊन बरे होऊ शकतात. ज्यांना इतर आजार आहेत अशा रुग्णांनी रुग्णालयात उपचार घ्यावेत. पल्स ऑक्सिमीटरचा नियमित वापर, योग्य आहार आणि काळजी घेतल्यास होम आयसोलेशनमधूनही कोरोनावर मात करता येते.

चाैकट

लवकर निदान, लवकर उपचार आवश्यक

डॉ. प्रिया प्रभू यांनी सांगितले की, कोरोनामध्ये सर्वांत महत्त्वाची वेळ असून रुग्णाची प्रकृती गंभीर होईपर्यंत न थांबता लक्षणे दिसल्यास तत्काळ आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. साैम्य लक्षणे असल्यास घरामध्येही मास्क वापरायला सुरू करावे. यामुळे आपण घरामध्ये होणारा प्रसार थांबवू शकतो. मास्कच्या वापरासह घरातील हवेसाठी खिडक्या, दारे उघडी ठेवावीत.

चौकट

डॉ. नाथानियल ससे म्हणाले, कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये मेंदूचे काही विकार, स्मरणशक्तीमध्ये अडथळा, एकाग्रतेमध्ये अडथळा असे विकार दिसून येत आहेत. हे परिणाम थोड्या कालावधीसाठी राहत असून ते हळूहळू निघून जातात. अशा विकारांबद्दल फारशी काळजी करू नये.