शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बायपास रस्त्यावर पोलिसांकडूनच वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST

सांगली : येथील बायपास पूल आणि शिवशंभो चौकात वाहतूक पोलिसांकडूनच कागदपत्रे तपासणीसाठी वाहने अडविली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत ...

सांगली : येथील बायपास पूल आणि शिवशंभो चौकात वाहतूक पोलिसांकडूनच कागदपत्रे तपासणीसाठी वाहने अडविली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. अडविलेली वाहने रस्त्यातच उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. चारही बाजूंनी या चौकात मोठ्या प्रमाणावर वाहने येत असल्याने ही तपासणी अन्य ठिकाणी करावी, अशी मागणी शहरातील वाहनधारकांमधून केली जात आहे.

महापालिकेकडून तक्रारीकडे दुर्लक्ष

सांगली : तरुण भारत क्रीडांगण ते विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या मार्गाच्या वळणावर उघड्या चेंबरमुळे अपघात होत आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी तक्रारी करूनही हे चेंबर बंदिस्त केले जात नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. एखाद्याचा बळी गेल्यानंतर महापालिका जागी होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राजापुरी हळदीला साडेतेरा हजार भाव

सांगली : सांगली मार्केट यार्डात शुक्रवारी ११ हजार ८०३ क्विंटल हळदीची आवक झाली होती. क्विंटल हळदीला जास्तीत जास्त १३ हजार ७०० रुपये तर हलक्या प्रतीच्या हळदीला सात हजार रुपये दर मिळाला आहे. सरासरी दहा हजार ३५० रुपये दर मिळाला आहे.

सांगलीत काकडी ५० रुपये किलो

सांगली : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना आता पोटाला थंडावा देणाऱ्या काकडीला मागणी वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाव खाणारी काकडी आता ५० रुपये किलोने विकली जात आहे. काकडीची आवकही बाजारात वाढली आहे. तरीही मागणी अधिक असल्याने भाव वाढत आहेत.

ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित

सांगली : ऐन उन्हाळ्यात सांगली शहरात वीजपुरवठा खंडित होत आहे. शुक्रवारी वसंतदादा कारखाना परिसरातील उपनगरांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला. कधी भर दुपारी, तर कधी मध्यरात्री अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे.