शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विट्यात जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क : विटा : कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असतानाच विटा शहरात आज शुक्रवारपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क :

विटा : कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असतानाच विटा शहरात आज शुक्रवारपासून पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद ठेवले होते. त्यामुळे शुक्रवारी जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी विट्याच्या बाजारपेठेत शुकशुकाट होता. परंतु, शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ जैसे थे होती. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट तर रस्त्यावर वर्दळ असल्याचे जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी पहावयास मिळाले.

विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शासनाने सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्याने विटा शहरात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत होती. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभा राहिले होते. खानापूर तालुक्यात दररोज दोनशे ते अडीचशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत होती.

त्यामुळे गुरुवारी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी ३०एप्रिलपासून विटा शहरात ७ दिवसांचा कडक जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय जाहीर केला होता. शुक्रवारी या निर्णयाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवत जनता कर्फ्यूमध्ये सहभाग घेतला. परंतु, शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत रस्त्यांवर नागरिकांची ये-जा दिसत होती. त्यामुळे शुक्रवारी पहिल्या दिवशी केवळ व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत होते.

दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विटा शहरात जनता कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अन्यथा विटा शहरात ७ दिवस जनता कर्फ्यू पुकारूनही कोरोना संसर्ग टाळता येणार नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

फोटो : ३००४२०२१-विटा-जनता कर्फ्यू :

ओळ : विटा येथे शुक्रवारपासून पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. पहिल्या दिवशीच शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.