शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जतमध्ये वाहतुकीचे तीनतेरा

By admin | Updated: October 23, 2014 22:49 IST

पोलिसांची बघ्याची भूमिका : वाहनधारकांची तारेवरची कसरत

जत : जत शहरातील मुख्य रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. पण वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जत पोलिसांनी गांधारीची भूमिका घेतल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.विजापूर ते गुहागर राज्यमार्ग जत शहरातून जातो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे हा रस्ता अरूंद होऊन येथे सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या रस्त्यालगत असलेले अतिक्रमण काढल्यास काही प्रमाणात येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे.शहरातील महाराणा प्रताप चौक, जयहिंद चौक, गांधी चौक, वाचनालय चौक व दगडी पूल या एकमेकाशी जोडणाऱ्या रस्त्यावर आणि मुख्य चौकात हातगाडीवाले आणि टपरी धारकांनी आपले बस्तान कायमस्वरुपात येथे बसविले आहे. त्यामुळे रस्ता अरूंद होऊन सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तसेच काही वेळा लहान-मोठे अपघात होत आहेत. या गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोर हातोहात दागिने, रोख रक्कम लंपास करीत आहेत. याचा आर्थिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी जत नगरपालिकेचे सहकार्य घेऊन मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारून व्यावसायिकांना तेथे बसण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था काही दिवस सुरळीत सुरू होती. याशिवाय त्यांच्या कार्यकालावधित शहरातील अतिक्रमण काढून रस्ते खुले करण्यात आले होते. त्यानंतर नगरपालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे सध्या जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.मंगळवार व गुरुवार या बाजाराच्या दिवशी आणि सणाचा बाजार असेल तर मुख्य बाजारपेठेत गर्दी होते. काहीवेळा मुख्य चौकातच काही हातगाडीवाले आपला गाडा लावून ठाण मांडतात. एखाद्या दोनचाकी अथवा चारचाकी वाहन चालकाने त्यांना हातगाडी बाजूला घेण्याची विनंती जरी केली तरी, त्यांच्याशी ते हुज्जत घालतात. येथे वाहतूक पोलीस कधीच फिरकत नाहीत. परंतु गावाबाहेरील मुख्य रस्त्यावर त्यांची उपस्थिती नियमित असते. यामागील गौडबंगाल काय आहे?, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)वाहतूक पोलिसांच्या भूमिकेचा संशयशहरातील महाराणा प्रताप चौक, जयहिंद चौक, गांधी चौक, वाचनालय चौक व दगडी पूल या एकमेकाशी जोडणाऱ्या रस्त्यावर आणि मुख्य चौकात हातगाडीवाले आणि टपरी धारकांनी आपले बस्तान कायमस्वरुपात येथे बसविले आहे. तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी जत नगरपालिकेचे सहकार्य घेऊन मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारून व्यावसायिकांना तेथे बसण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था काही दिवस सुरळीत सुरू होती. त्यानंतर नगरपालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे सध्या जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.