शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार लिटर पेट्रोल रस्त्यावर!

By admin | Updated: June 15, 2016 00:03 IST

सांगलीतील घटना : टँकरला गळती; वीज पुरवठ्यासह वाहतूक बंद

सांगली : पेट्रोलने भरलेल्या एका टँकरला अचानक गळती लागल्याने सुमारे तीन हजार पेट्रोल रस्त्यावर सांडले गेले. येथील बायपास रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. प्रसंगाधान ओळखून बायपास मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. तसेच वीज पुरवठाही बंद केला होता. रात्री साडेआठ वाजता राहिलेले पेट्रोल दुसऱ्या टँकरमध्ये भरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मिरजेतील इंधन डेपोत रविवारी दुपारी ट्रँकरमध्ये (क्र. एमएच ०९ बीसी ४१४९) पेट्रोल भरण्यात आले होते. त्यानंतर हा टँकर वांगी (ता. कडेगाव) येथील पेट्रोल पंपावर पुरवठा करण्यासाठी निघाला होता. इस्लामपूर बायपास रस्त्यावर आल्यानंतर चालकाला पेट्रोलची गळती सुरू असल्याचे लक्षात आले. त्याने तातडीने टँकर रस्याकडेला घेतला. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन अधिकारी शिवाजीराव दुधाळ, शहर पोलिस निरीक्षक अनिल गुजर, वाहतूक पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा हेही दाखल झाले. पहिल्यांदा बायपास मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. टँकरमध्ये १५ हजार लिटर पेट्रोल होते. यातील तीन हजार लिटरच्या कप्प्याला गळती लागली होती. अग्निशनच्या जवानांनी गळती बंद होते का, यासाठी प्रयत्न केले, पण गळती सुरूच राहिली. त्यामुळे मिरजेतील इंधन डेपोत संपर्क साधून मोकळा टँकर (क्र. एमएच १० झेड ३८०५) बोलावून घेण्यात आला. या टँकरमध्ये सर्व पेट्रोल भरण्यात आले. दीड तास ही प्रक्रिया सुरू होती. साडेआठ वाजता पेट्रोलने भरलेला टँकर वांगीकडे रवाना करण्यात आला. अग्निशमनच्या जवानांनी पाणी मारून रस्ता स्वच्छ करून घेतला. (प्रतिनिधी)अनर्थ टळलाचालकाने प्रसंगाधान ओळखून तातडीने टँकर थांबवला. अग्निशमन विभाग व पोलिस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. तातडीने उपाययोजना राबविल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.