शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

गवंड्याच्या खूनप्रकरणी तिघांना दहा दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST

इस्लामपूर : इस्लामपूर-कापूसखेड रस्त्यावरील ओसवाल प्लॉट परिसरात गवंड्याचा खून करणाऱ्या तिघांना येथील न्यायालयाने २० मार्चपर्यंत तब्बल दहा दिवस पोलीस ...

इस्लामपूर : इस्लामपूर-कापूसखेड रस्त्यावरील ओसवाल प्लॉट परिसरात गवंड्याचा खून करणाऱ्या तिघांना येथील न्यायालयाने २० मार्चपर्यंत तब्बल दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. खून करणारे संशयित लूटमार आणि दुुखापतीचे गुन्हे करणारे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. गवंड्याच्या खिशातील पैसे लुटण्यासाठी त्याला निर्जनस्थळी नेऊन त्याचा खून केल्याचे समोेर आले आहे.

संदीप शिवाजी कुटे, अनिल गणेश राठोड (दोघे रा. लोणार गल्ली, इस्लामपूर) व ऋतिक दिनकर महापुरे (रा. खांबे मळा, इस्लामपूूर) अशी अटकेत असलेल्या तिघा संशयियतांची नावे आहेत. हे सर्वजण झोपडपट्टी दादा विरोधी कायद्याखाली स्थानबद्ध असलेल्या रवी खोत याच्या टोळीतील साथीदार आहेत. राजेश सुभाष काळे (रा. नेहरूनगर, इस्लामपूर) असे मृताचे नाव आहे.

रविवारी मध्यरात्रीनंतर या तिघांनी राजेश काळे याचा लोखंडी रॉड आणि दगड डोक्यात घालून खून केला. त्याच्या खिशातील पैसे आणि मोबाइल काढून घेत तिघांनी तेथून पोबारा केला. निर्जनस्थळी घटना घडल्याने प्रत्यक्ष पुरावा अथवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेत तपास सुरू ठेवला होता. बुधवारी सायंकाळी अटकेची कारवाई करेपर्यंत हे तिघे हल्लेखोर शहरामध्ये फिरत होते. खुनाच्या दुुसऱ्या दिवशी हे तिघेही जेथून काळे याला उचलला त्याच मद्यालयात दारू पिण्यासाठी गेल्याची चर्चा होती. या दरम्यान तांत्रिक बाबींचा आधार घेत इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने या तिघांच्या मुसक्या आवळल्या. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख अधिक तपास करीत आहेत.