शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत तीन डॉक्टरांना अटक

By admin | Updated: August 23, 2014 00:06 IST

बेकायदा गर्भपात : एक दिवसाची पोलीस कोठडी

सांगली : येथील आंबेडकर रस्त्यावरील श्री मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटलमध्ये बेकायदा १०७ गर्भपात केल्याचा आरोप असलेल्या तीन डॉक्टरांना आज (शुक्रवार) शहर पोलिसांनी अटक केली. डॉ. अर्जुन दत्ताजीराव पाटील (वय ४३), त्यांच्या पत्नी व मॅटर्निटीच्या प्रमुख डॉ. सुषमा अर्जुन पाटील (३२) व डॉ. माधुरी विजय जाधव (४७, सर्व रा. आंबेडकर रस्ता, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाने श्री मॅटर्निटीवर छापा टाकला होता. यामध्ये केलेल्या तपासणीत १०७ गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. वैद्यकीय गर्भ सामग्री अधिनियमानुसार डॉक्टर पाटील दाम्पत्य, डॉ. माधुरी जाधव व डॉ. संतोष जयपाल पाटील यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हॉस्पिटलमधील सोनोग्राफी यंत्र सील करण्यात आले होते. ज्या महिलांचे गर्भपात करण्यात आले आहेत, या सर्व महिलांच्या नावांची नोंद आहे. त्यांचे पत्ते व भ्रमणध्वनी क्रमांकही आहेत. आतापर्यंत पोलिसांनी यातील पन्नासहून अधिक महिलांशी संपर्क साधला आहे. या महिलांनी कोणत्या कारणासाठी गर्भपात केला, याची माहिती घेतली जात आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस तपास करीत आहेत. गर्भपात केलेल्या काही महिलांना जबाब घेण्यासाठी बोलाविण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: तपासात लक्ष घातले आहे. आज सकाळी पाटील दाम्पत्यासह माधुरी जाधव यांना अटक करण्यात आली. त्यांना दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. (प्रतिनिधी)