शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत अतिरिक्त पदभारामुळे दमछाक

By admin | Updated: September 7, 2014 23:26 IST

महापालिकेची स्थिती : अधिकाऱ्यांकडे जादा पदभार

सांगली : महापालिकेच्या कारभाराची दोरी सध्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहे. एकाच अधिकाऱ्याकडे अनेक विभागांचा पदभार आहे. या अतिरिक्त पदभारामुळे पालिकेच्या कारभाराच्या ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ झाल्या असून, एकेका विभागाला न्याय देईपर्यंत अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. पालिकेत पाच वर्षापूर्वी विकास महाआघाडी सत्तेवर आल्यानंतर सर्वच विभागात प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांचा भरणा झाला होता. प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना परत पाठवा, यासाठी आंदोलनेही झाली. पालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती न देता शासनाकडून अधिकारी मागविल्याची ओरड झाली. प्रतिनियुक्तीवरील काही अधिकाऱ्यांनी पालिकेला चांगली शिस्त लावली, तर काहींनी केवळ तीन वर्षे कामचलावू कामगिरी केली. पालिकेत सत्ताबदल होण्यापूर्वी आणि सत्ताबदल झाल्यानंतर त्यापैकी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.त्यात प्रामुख्याने शहर अभियंता, पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता, नगररचनाचे सहाय्यक संचालक, आरोग्यचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी या महत्त्वाच्या पदांचा समावेश होता. या पदांवर आता नव्याने काही अधिकारी दाखल झाले आहेत, तर काही पदे अजूनही रिक्त आहेत. वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. सुनील आंबोळेंकडे पदभार आहे. त्यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप असून, याप्रकरणी ते निलंबित होते. पण निलंबनाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे आरोग्यचा पदभार देण्यात आला आहे. आरोग्यकडील वैद्यकीय विभाग डॉ. रोहिणी कुलकर्णी सांभाळतात. नगरसचिवपदी चंद्रकांत आडके यांची नियुक्ती केली होती. आता नगरसचिव पदासह त्यांच्याकडे आयुक्तांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जबाबदारी आहे. रमेश वाघमारे यांच्याकडे मालमत्ता व्यवस्थापक, सहाय्यक आयुक्त, तर नव्यानेच महापालिका सेवेत दाखल झालेले डॉ. प्रशांत रसाळ यांच्याकडे मिरजेच्या उपायुक्तपदाचा व अतिक्रमण विभागाचा पदभार आहे. कुपवाडचे सहाय्यक आयुक्त सुनील नाईक यांना त्यांच्या पदासह लेखापालाचीही जबाबदारी पार पाडावी लागते. तीच स्थिती उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांचीही आहे. त्यांच्याकडे मुख्य लेखापरीक्षकाचा पदभार असतो. पालिकेतील अनेक अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्याशिवाय सेवेतील अधिकारी दीर्घ रजेवर गेल्यास त्यांचा पदभार कोणत्या ना कोणत्या अधिकाऱ्याला सांभाळावा लागतोच. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे अधिकाऱ्यांना एकाच विभागाला न्याय देता येत नाही. (प्रतिनिधी)अधिकारी व पदेओमप्रकाश दिवटे : उपायुक्त सांगली, मुख्य लेखापरीक्षकप्रशांत रसाळ : उपायुक्त मिरज, मुख्य लेखापाल, अतिक्रमण एस. जी. मुजावर : एलबीटी अधीक्षक, विधी विभागप्रमुखटीना गवळी : सहाय्यक आयुक्त, मिरज व कुपवाडरमेश वाघमारे : सहाय्यक आयुक्त सांगली, मालमत्ता व्यवस्थापक, प्रशासन अधिकारीचंद्रकांत आडके : नगरसचिव, जनसंपर्क अधिकारी, आयुक्तांचे स्वीय सहाय्यक