शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

अजय कांबळे टोळीविरूद्ध हजार पानाचे दोषारोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अजय बापू कांबळे (वय २३, राजीव गांधीनगर झोपडपट्टी, जुना बुधगाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अजय बापू कांबळे (वय २३, राजीव गांधीनगर झोपडपट्टी, जुना बुधगाव रस्ता, सांगली) याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमानुसार (मोका) कारवाई करण्यात आली होती. या टोळीविरोधात हजार पानांचे दोषारोपपत्र मंगळवारी मोका न्यायालयात दाखल करण्यात आले.

कांबळेसह सोहेल सलीम अंकलगी (१९, वाल्मिकी आवास), अरबाज महंमद हनिफ माजगावकर (१९, वाल्मिकी आवास), रमजान आयुब शेख (१९, दत्तनगर) यांचा त्यात समावेश आहे. टोळीविरोधात खुनी हल्ला, जबरी चोरी, दरोड्यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिली.

अजय कांबळे सराईत गुन्हेगार असून त्याने दहशतीसाठी टोळी तयार केली होती. २०१५ पासून टोळीने सांगलीसह परिसरात गुन्हे केले आहेत. स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी टोळीने दहशत निर्माण केली. खुनी हल्ल्यासह जबरी चोरी, दरोडा, चोरी, घरफोडी असे गंभीर गुन्हे टोळीवर दाखल आहेत. टोळीने तीन महिन्यांपूर्वी घरफोडी, जबरी चोरीसह तब्बल २७ गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश पंडित पुजारी (वय २३, वाल्मिकी आवास घरकूल) याच्यावर तलवारीसह धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला होता. चोरीच्या सोन्याची वाटणी आणि पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर कांबळे पसार होता. त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. टोळीची वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी मोकाअंतर्गत प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी प्रस्ताव सादर केला. कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी तातडीने मंजुरी दिली. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक टिके यांना केला. तपास पूर्ण करून न्यायालयात मंगळवारी दोषारोपपत्र दाखल केले.