शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

तासगावातील जुने भाजपेयी शिवसेनेत

By admin | Updated: January 10, 2016 01:01 IST

तालुकाध्यक्ष नामधारी : संजयकाका गटाने जुन्यांचे अस्तित्व झाकोळले

दत्ता पाटील/तासगाव तासगाव तालुक्यात मोजक्याच कार्यकर्त्यांच्या बळावर भाजपचे पदाधिकारी निवडणुकीत अस्तित्व दाखवून देण्याइतपत कामगिरी बजावायचे. मात्र संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तालुक्यात भाजप दमदार झाला. तेव्हापासून काका गट म्हणजेच भाजप असे समीकरण झाले. त्यामुळे घुसमट होत असलेल्या भाजपच्या काही जुन्या कार्यकर्त्यांनी शिवेसेनेचा रस्ता धरला आहे. तर भाजपचे तालुकाध्यक्षही नामधारीच राहिलेले असून, काका गटाच्या प्रभावाने जुन्या भाजपेयींचे अस्तित्व नामधारी राहिले आहे. तासगाव तालुक्यात आबा गट आणि काका गट वगळता इतर पक्ष आणि संघटनांचे अस्तित्व तसे तोकडेच राहिले आहे. खासदार संजयकाका पाटील आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील हे नेते ज्या पक्षात तेच पक्ष तालुक्यात सक्षम होते. संजयकाकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आबा आणि काका गट राष्ट्रवादीच्या माध्यमातून एका झेंड्याखाली आले. त्यावेळी तालुक्यात मर्यादित कार्यकर्त्यांचे जाळे असणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी या दोन्ही नेत्यांना आव्हान देत, चार वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवली होती. तालुक्यात भाजपचे अस्तित्व कायम राखण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न केला होता. तरीही भाजपची ताकद मर्यादितच राहिली होती. लोकसभा निवडणुकीच्या काळात संजयकाकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे खासदार म्हणून जिल्हा नेतृत्वावर शिक्कामोर्तबही झाले. संजयकाकांसोबत त्यांच्या समर्थकांनीही भाजपची वाट धरली. त्यामुळे तालुक्यात पहिल्यांदाच भाजपचा वरचष्मा दिसू लागला. काही महिन्यांपूर्वी तासगाव नगरपालिकेत सुशीला साळुंखेंनी भाजपच्या नगराध्यक्षा होण्याचा मान मिळवला. तालुक्यात एकीकडे भाजपची राजकीय आगेकुच सुरु असताना, दुसरीकडे जुन्या भाजप कार्यकर्त्यांची घुसमट बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे तासगाव शहरप्रमुख संग्राम पाटील, जिल्हा युवा मोर्चाचे सागर बाबर यांच्यासह पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा रस्ता धरला. काका गटाच्या वर्चस्वापुढे जुन्या भाजपवाल्यांचे अस्तित्व झाकोळले गेल्याने, त्यांची घुसमट होत होती. त्यामुळेच काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपचे तालुकाध्यक्षपददेखील केवळ नामधारीच आहे. तालुक्यात पक्षामध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडीत तालुकाध्यक्षांचा वावर कोठेच दिसून येत नाही. खासदार गटाकडून तर तालुकाध्यक्षपदच अदखलपात्र करण्यात आले आहे. त्यामुळे तालुकाध्यक्षांसह जुन्या निष्ठावंत भाजपप्रेमींची नव्या गटासोबत फरफट होत असल्याचे दिसून येत आहे.