शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीमध्ये डेंग्यूसदृश तापाचे शंभरावर रुग्ण

By admin | Updated: July 28, 2016 00:58 IST

महापालिका सुस्त : शासकीय, खासगी रुग्णालयात गर्दी

सांगली : सांगली महापालिका हद्दीत डेंग्यूसदृश साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून, शंभरहून अधिकजणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समजते. आतापर्यंत ३२ रुग्ण आढळले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डेंग्यू उपायाबाबत उपाययोजना करण्यात महापालिका प्रशासन अयशस्वी ठरली आहे. खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांमध्ये वाढ होत असते. त्यात डेंग्यूचा शहरात फैलाव झाल्याचे चित्र आहे. गेल्या पंधरवड्यात डेंग्यूसदृश साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. शहरातील मुख्य भाग असलेल्या गावभाग व परिसरात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. या परिसराबरोबरच संजयनगर, वारणाली, पत्रकारनगर, खणभाग, तर मिरज शहरातील विस्तारित भागातही डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व्हे मोहीम सुरू केली असून, संशयित रुग्णांची संख्या शंभरावर पोहोचली आहे. महापालिकेने सिव्हिलबरोबरच महापालिकेच्या रुग्णालयांत उपचारासाठी यंत्रणा सज्ज केली असली तरी, खासगी रुग्णालयांतही रुग्ण दाखल होत आहेत. याबाबत महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चारूदत्त शहा यांनी सांगितले की, शहरात तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. ज्या रुग्णांना थंडी, तापासह अंगदुखी, घसा दुखणे आदी लक्षणे दिसून येत आहेत, त्यांनी डेंग्यूची तपासणी करून घ्यावी व तात्काळ उपचार घ्यावेत. नागरिकांनी स्वच्छ पाणी झाकून ठेवावे व आठवड्यातून एकदा सर्व पाण्याची भांडी कोरडी करून घ्यावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)जास्त शुल्क नको!डेंग्यूच्या तपासणीसाठी सर्वच खासगी लॅबोरेटरींनी ६०० रुपयांपेक्षा जास्त शुल्क घेऊ नये, असे आदेश देण्यात आले असून, सर्व खासगी रुग्णालये व लॅबोरेटरींना नोटिसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.