शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिकचे वादग्रस्त २९ प्रस्ताव सापडले

By admin | Updated: July 2, 2015 00:24 IST

आठवड्यात प्रस्तावांची छाननी : चौकशीनंतरच शिक्षकांना पगार

सांगली : शिक्षण आयुक्तांनी निलंबित केलेले जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लोंढे यांनी त्यांच्या कार्यकाळात १९० शिक्षकांच्या नियमबाह्य नियुक्त्या केल्याचे प्रथमदर्शनी तपासणीत दिसून आले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करताना २९ प्रस्ताव गायब झाल्याचे दिसून आले होते. परंतु, अधिक तपासात ते प्रस्ताव कोल्हापूर उपसंचालकांकडे आढळून आल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.दत्तात्रय लोंढे यांनी १ जून २०१० रोजी प्रभारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पदाचा कार्यभार स्वीकारला होता. चार महिन्यांच्या कार्यकाळात त्यांच्या कार्यपध्दतीविषयी तक्रारी होत्या. या सर्व प्रकरणांची चौकशी केली असता, त्यामध्ये लोंढे यांनी, मागासवर्गीय अनुशेष असताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना मान्यता देणे, जात प्रमाणपत्र नसताना नियमबाह्य नेमणुका करणे, राज्याबाहेरील डी. एड्. आणि बी. एड्. उमेदवार शिक्षकांच्या नियुक्तीस मान्यता देणे आदींमुळे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी लोंढे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. लोंढे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यापूर्वीच शिक्षण सहसंचालक संपतराव गायकवाड यांनी लोंढे यांच्या कार्यकाळातील १९० प्रकरणांची चौकशी केली. त्यामध्ये प्रथमदर्शनी २९ शिक्षकांच्या नियुक्त्या या नियमबाह्य करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर लोंढे यांच्या कार्यकाळातील १९० शिक्षकांना सुनावणीसाठी बोलाविण्यात आले. यावेळी २९ प्रस्ताव गायब असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर शिक्षण विभागाने अधिक चौकशी केल्यानंतर ते प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांकडे असल्याचे दिसून आले आहे. यामुळे त्या प्रस्तावांची चौकशी करून आठवड्यात शिक्षण उपसंचालकांकडे अहवाल देण्यात येईल. त्यांच्याकडून चौकशी अहवालावर अभिप्राय आल्यानंतर जे दोषी नसतील, त्या शिक्षकांचे पगार सुरू होतील. जे दोषी सापडतील त्यांना नोकरीला कायमचे मुकावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)नोकरीला मुकावे लागणारगायब झालेले २९ प्रस्तावांची चौकशी करून आठवड्यात शिक्षण उपसंचालकांकडे अहवाल देण्यात येईल. त्यांच्याकडून चौकशी अहवालावर अभिप्राय आल्यानंतर जे दोषी नसतील, त्या शिक्षकांचे पगार सुरू होतील. जे दोषी सापडतील त्यांना नोकरीला कायमचे मुकावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.