शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अभय योजनेस थंडा प्रतिसाद

By admin | Updated: June 30, 2015 00:19 IST

शुक्रवारी बैठक : एलबीटी वसुलीस ३१ जुलैची मुदत

सांगली : राज्य शासनाने थकित एलबीटीसाठी दंड व व्याज माफीसाठी अभय योजना लागू केली. पण या योजनेलाही सांगली महापालिका हद्दीतील व्यापाऱ्यांनी थंडा प्रतिसाद दिला आहे. या योजनेचा लाभ ३१ जुलैपर्यंत घेता येणार आहे. त्यानंतर महापालिकेकडून एलबीटी वसुलीसाठी कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अभय योजनेबाबत महापालिकेच्यावतीने शुक्रवार दि. ३ जुलै रोजी सांगली व मिरजेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाने थकित एलबीटीसाठी दंड व व्याज माफीची घोषणा केली आहे. ३१ मार्च २०१५ पर्यंत थकित असलेल्या व्यापाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत संपूर्ण कर भरल्यास, त्यांना व्याज व दंड माफ केला जाणार आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांना विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. पण सांगलीतील व्यापाऱ्यांनी अभय योजनेकडेही पाठ फिरविली आहे. जून महिन्यात आजअखेर केवळ पाच कोटी रुपयांचा एलबीटी वसूल झाला आहे. व्यापाऱ्यांचा थंडा प्रतिसाद पाहता, महापालिकेने अभय योजनेची माहिती देण्यासाठी शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले आहे. मिरजेत सकाळी साडेअकरा वाजता, तर सांगलीत साडेचार वाजता ही बैठक होणार आहे. दरम्यान, एलबीटीविरोधी कृती समितीनेही अभय योजनेचा अर्ज भरून देण्याचे आवाहन केले आहे. मुदतीत अर्ज भरणाऱ्यांनाच दंड व व्याजमाफी मिळणार आहे. पालिका अधिकाऱ्यांनी विवरणपत्र भरण्यासाठी व्यापाऱ्यांना सहकार्य करावे, विनाकारण त्रास देण्याची भूमिका असू नये, अन्यथा नवा वाद होईल, असे समीर शहा यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)अभय योजनेच्या अटीएलबीटीअंतर्गत नोंदणी अनिवार्य३१ जुलैपर्यंत विवरणपत्र व कर भरणा बंधनकारकयोजनेचा लाभ घेतल्यानंतर न्यायालयात गेल्यास सवलती काढून घेणारव्यापाऱ्यांनी दाखल अपील विनाशर्त मागे घेणे आवश्यक