शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पेठनाक्यावरील कापड उद्योग ‘सलाईन’वर

By admin | Updated: January 14, 2015 00:29 IST

राजकीय हस्तक्षेपाचा परिणाम : हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ

अशोक पाटील - इस्लामपूर 0-पेठनाका (ता. वाळवा) परिसरातील इको बोर्ड कंपनीने गाशा गुंडाळल्यानंतर आता तेथील एका वस्त्रोद्योग प्रकल्पाचीही तशीच अवस्था झाली आहे. हा कारखाना कोणत्याही क्षणी बंद पडणार असून, तेथील हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे.माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी मतदारसंघातील महिलांच्या हाताला रोजगार देण्यासाठी पेठनाका येथे राष्ट्रीय महामार्गालगत खासगी स्वरूपातील कापड उद्योग आणला. परिसरातील हजारो एकर जमीन विकत घेऊन हा प्रकल्प उभा करण्यात आला. या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या, त्यांच्या मुलांना येथे नोकरी देण्यात आली. सध्या हा कारखाना अडचणीत आला असून, कामगारांना शासनाच्या नियमानुसार पगार दिला जात नाही. चार-चार तास जादा काम करूनही त्याचा मोबादला मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. प्रकल्प सुरू झाल्यापासून भविष्य निर्वाह निधीची रक्कम शासनाकडे जमा नसल्याचे आढळून आले आहे. काही कामगारांनी याचा जाब विचारला असता, त्यांना कामावरून कमी करण्यात आले.हा वस्त्रोद्योग प्रकल्प अडचणीत असून, काहींनी तर या प्रकल्पात समावेश असलेल्या छोट्या उद्योगांवरील अनुदान लाटून त्याच्याशी संबंधित जागाही विकल्या आहेत. जयंत पाटील यांनी तालुक्याच्या विकासासाठी आणलेल्या उद्योगांपैकी वाळवा येथील भवरी स्टार्च, इको बोर्ड आणि औद्योगिक वसाहतीतील काही उद्योग बंद पडले आहेत. त्यापाठोपाठ आता पेठनाक्यावरील कापड उद्योगाचीही तशीच अवस्था झाली आहे.कामगारांत घुसमटवेळेत पगार मिळत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून बरेच कामगार नोकरी सोडून गेल्याने येथे कामगार मिळणेही अवघड झाले आहे. या प्रकल्पात राजकीय मंडळींचा हस्तक्षेप झाला असून, राजकारणातून विरोधकांच्या गटातील कामगार तडकाफडकी काढून टाकण्यात आले आहेत. या प्रकल्पात पात्रता नसताना अधिकाऱ्यांची नेमणूक केली गेली आहे. ते अधिकारी आता कामगारांना दमदाटी करीत आहेत. त्यामुळे यातील बहुतांशी कामगारांनी कामावर न जाणेच पसंत केले असून, त्यांच्या पगारापोटी असलेल्या लाखोंच्या रकमा देण्यासही टाळाटाळ केली जात असल्याचे काही कामगारांनी सांगितले.पेठनाका येथील कापड उद्योगासाठी पिकाऊ जमिनी घेतल्या आहेत. ज्या भूमिपुत्रांना नोकरीवर घेतले, त्यांना आता पगारही दिले जात नाहीत. कामगार कायदा धाब्यावर बसवला आहे. कारखान्याची अवस्था दयनीय झाली आहे. हा उद्योग काही दिवसातच गुंडाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे कारखान्यातील भागीदार उद्योजक हैराण झाले आहेत. कामगारांना न्याय देण्यासाठी प्रसंगी आंदोलन करू.- सम्राट महाडिक, जिल्हा परिषद सदस्य, पेठ.