शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मार्केटमध्ये दहशत माजवत लुटणारे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:15 IST

सांगली : शहरातील स्टेशन चौकात असलेल्या गणेश मार्केटमधील व्यापाऱ्यांना चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या संशयितांना अटक करण्यात आली. अरबाज अस्लम ...

सांगली : शहरातील स्टेशन चौकात असलेल्या गणेश मार्केटमधील व्यापाऱ्यांना चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या संशयितांना अटक करण्यात आली. अरबाज अस्लम खान (वय २१), अक्षय संतोष निकम (२१), करण प्रकाश गोसावी (२३, तिघेही रा. गल्ली क्रमांक पाच, प्रकाशनगर, अहिल्यानगर, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणसह शहर पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी संशयितांनी गणेश मार्केटमध्ये येत दहशत माजविली होती. हातातील चाकू काऊंटरवर ठेवून दुकानातील साहित्य धाकाने घेतले जात होते. नरेश भरतकुमार धनवाणी यांच्या दुकानातून ८०० रुपयांचा शर्ट घेण्यात आला. त्यानंतर आनंद लक्ष्मणदास धनवाणी यांच्या दुकानात संशयित गेले. त्याठिकाणाही साडेपाचशे रुपयांचा गॉगल अशाचप्रकारे घेण्यात आला. त्याचवेळेत बलराज गोपीचंद धनवाणी यांच्या होजिअरी दुकानातून १२०० रुपयांचे जॅकेट नेण्यात आले. तेथून पुढे सलमान इस्लामअली शेख यांच्या कपड्याच्या दुकानातून साडेतीनशे रुपयांची जीन्स पॅन्टही संशयितांनी चोरून नेली.

दिवसभरात चाकूच्या धाकाने लुटीचा प्रकार घडल्यानंतर व्यवसायिकांनी शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

त्यानंतर एलसीबीसह शहर पोलिसांचे पथकाने तिघांना अटक केली. यात शहर पोलिसांच्या पथकाने करण गोसावी यास अटक केली. एलसीबीच्या पथकाने अरबाज खान आणि अक्षय निकम यांना कुपवाडमधील चाणक्‍य चौकातून ताब्यात घेतले. या संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, शहरचे निरीक्षक अजय सिंदकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.