शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार सांगलीकर म्हणतात, कोणताच उमेदवार पसंत नाही...

By admin | Updated: October 23, 2014 00:07 IST

विधानसभा निवडणूक : ‘नोटा’ मताचा सर्वाधिक वापर, प्रत्येक मतदारसंघात लोकांनी नोंदविला नकाराधिकार--लोकमत विशेष

अंजर अथणीकर - सांगली -निवडणूक रिंगणातील कोणताही उमेदवार पसंत नाही म्हणून नकाराधिकार (नोटा) वापरण्याची सोय विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच करण्यात आली होती. सांगली जिल्ह्यात याचा वापर तब्बल दहा हजार मतदारांनी केला आहे. या दहा हजार मतदारांना एकही उमेदवार अवडला नाही. यामुळे सर्वच पक्षांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. या अधिकाराचा सर्वाधिक वापर मिरज मतदारसंघात, तर कमी वापर पलूस-कडेगाव मतदारसंघात झाला आहे. लोकसभा निवडणुकीपासून मतदारांना नकारात्मक मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मतदान यंत्रावर (ईव्हीएम) सर्वात शेवटी याचे चिन्ह ठेवण्यात आले होते. वरून सर्व उमेदवारांची पाहणी करून यामधील कोणीही आवडले नाही तर शेवटी मतदारांसाठी ‘नोटा’ मतदानाचा पर्याय मतदारांना देण्यात आला होता. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात ‘नोटा’चा अधिकार ९ हजार ७३८ मतदारांनी वापरला आहे. या मतदारांना एकही उमेदवार पसंत पडलेला नाही. एवढ्या मोठ्याप्रमाणात नकाराधिकाराचा वापर झाल्याने राजकीय पक्षांना धक्का बसला आहे. प्रत्येक मतदारसंघात हजार ते दोन हजारपर्यंत मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला आहे. लोकसभा निवडणुकीत सुमारे दीड हजार मतदारांनी संपूर्ण जिल्ह्यात ‘नोटा’चा वापर केला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र मोठ्याप्रमाणात याचा वापर झाल्याने राजकीय पक्षांवर आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. राजकीय पक्षांनी चांगला उमेदवार दिला असता, तर नोटाचा वापर करण्याची वेळ मतदारांवर आली नसती. ‘नोटा’चा सर्वाधिक वापर झाला असला, तरी सध्या तरी त्याचा काहीच परिणाम होणार नाही. राजकीय पक्षांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठीच याचा उपयोग होणार आहे. ‘नोटा’च्या वापराला काही राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला होता. हा अधिकार नको, असे त्यांचे म्हणणे होते; मात्र काही मतदारांना कोणताच उमेदवार पसंत नाही, त्यांनी काय करायचे? त्यांनी आपले मत कसे व्यक्त करायचे, असा लढा दिल्यानंतर निवडणूक आयोगाने ‘नोटा’चा अधिकार मतदारांना दिला आहे. याचे प्रमाण वाढल्यास भविष्यात याचा सर्वच पक्षांना गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.